शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीमुळे ७० टक्के नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:29 IST

औरंगाबाद तालुक्यातील शेतक-यांच्या कपाशीचे बोंडअळीमुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून, अर्ज स्वीकारणे व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

श्रीकांत पोफळे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील शेतक-यांच्या कपाशीचे बोंडअळीमुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून, अर्ज स्वीकारणे व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ५५०० अर्ज प्राप्त झाले असून, अर्जांचा ओघ सुरूच असल्याची माहिती प्रभारी कृषी अधिकारी आर. एम. राठोड यांनी दिली.औरंगाबाद तालुक्यातील शेतकºयांचे यावर्षी खरिपात मोठे नुकसान झाले आहे. त्यात कापूस महत्त्वाचे पीक आहे. कापूस पिकाचे एकूण क्षेत्र ४५,९३२ हेक्टर आहे. मागील वर्षी तालुक्यातील कापसाचे उत्पादन ७८० मेट्रिक टन झाले होते. त्यात ४५०० भावाने एकूण ३५१ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या पदरी पडले होते. यावर्षी १९५ मेट्रिक टन उत्पादन असून, ४५०० रुपयांच्या दराने त्याचे एकूण मूल्य ८.५ ते ९ कोटी उत्पन्न शेतकºयांच्या पदरी पडणार आहे. यंदा ७५ टक्के नुकसान कापूस उत्पादक शेतकºयांना सहन करावे लागणार आहे. दोन महिने पावसाने उघडीप दिली त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली, परतीच्या पावसाने थोडी फार आशा निर्माण झाली होती; परंतु बोंडअळीने पुन्हा शेतकºयांच्या हसºया चेहºयावर नैराश्य पसरले. लागवडीसाठी केलेला खर्चदेखील निघणार नाही. सर्वच शेतकºयांना फक्त पहिल्या वेचणीत जास्तीत जास्त कापूस चांगल्या दर्जाचा काढता आला. दुसºया वेचणीत बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले व कपाशी बोंडअळीमुळे बाधित झाल्याने तालुक्यातून नुकसानभरपाईची जोरदार मागणी झाली. त्यानंतर सरकारने कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले.अर्ज स्वीकारणे व पंचनामे युद्धपातळीवर सुरूतालुका कृषी कार्यालयामार्फत अर्जांचे वाटप करण्यात आले असून, या अर्जांसोबत कापसाचे बियाणे खरेदीचे बिल, सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. बाधित शेतकºयांनी कृषी कार्यालयात अर्ज केल्यानंतर कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतावर पंचनामा करीत आहे. ७० ते ८० टक्के कापूस बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.