शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

७० लाख लग्न अन् १३ लाख कोटी झाला खर्च, ८० टक्के रक्कम थेट बाजारात दाखल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 15, 2023 11:31 IST

एका लग्नात ४५० ते ४७५ लोकांना काम मिळाले

प्रशांत तेलवाडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: लगीन हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. धूमधडाक्यात लग्नसोहळे पार पडले. जानेवारी ते जूनदरम्यान पार पडलेल्या ४९ लग्नतिथींवर देशात ७० लाख लग्न लागली. त्यातून तब्बल १३ लाख कोटींची उलाढाल झाली असून, त्यातील ८० टक्के रक्कम ही बाजारपेठेत आली. व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॅन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. कॅट संघटनेचे महाराष्ट्रातील वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, यंदाच्या लग्न हंगामात १३ लाख कोटींची उलाढाल झाली. एका लग्नात मंगल कार्यालय, पत्रिका, कापड व्यापारी, केटरिंग, फोटोग्राफर, ट्रॅव्हल्स एजन्सीपासून ४५० ते ४७५ लोकांना काम मिळते. 

२०% डेस्टिनेशन वेडिंग 

७० लाख लग्नांपैकी ४० ते ५० टक्के लग्न हे ग्रामीण भागात झाले आहेत. २० टक्के हे डेस्टिनेशन वेडिंग होते. काही लग्न व्हिसा मिळाला नाही म्हणून वधू-वराने विदेशातच लावले, असे कॅटचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले.

कोणत्या महिन्यात किती लग्नतिथी

जानेवारीत ९,फेब्रुवारीत १३, मार्चमध्ये ६, मेमध्ये १३, जूनमध्ये ११ अशा एकूण ५२ लग्नतिथी होत्या. आता जूनमधील २३,२६ व २७ या मुख्य लग्नतिथी शिल्लक आहेत.

लग्नसंख्या - खर्च (प्रत्येकी) 

  • १० लाख    ३ लाख
  • १० लाख    ५ लाख
  • १५ लाख    १० लाख 
  • १० लाख    १५ लाख
  • १० लाख    २५ लाख 
  • १० लाख     ३५ लाख
  • ३ लाख     ५० लाख
  • २ लाख    १ कोटी
टॅग्स :marriageलग्न