शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सहस्त्रकुंडा’त अडकलेल्या ७ पर्यटकांना वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:56 IST

सहस्त्रकुंड धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने धबधबा पाहण्यासाठी आलेले ७ पर्यटक मध्यभागी अडकले. सातही जणांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात भोईंसह पोलिस व महसूल प्रशासनाला यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लापूर : सहस्त्रकुंड धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने धबधबा पाहण्यासाठी आलेले ७ पर्यटक मध्यभागी अडकले. सातही जणांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात भोईंसह पोलिस व महसूल प्रशासनाला यश आले.इस्लापूरपासून चार कि़मी़ अंतरावर असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून येत असतात. गुरुवारीही बरेच पर्यटक धबधबा परिसरात होते. यातील ७ जण धबधब्याची धार पाहण्यासाठी मध्यभागी उभे होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना मध्यभागातून बाहेर निघणे अवघड झाले. सात पर्यटकात ५ पुरूष व २ महिलांचा समावेश होता. सातही जण जीव मुठीत घेवून मदतीची याचना करीत होते. हा प्रकार बाहेर उभ्या पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रथम इस्लापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.पोलिस उपनिरिक्षक विक्रम विठूगोने, गोपनीय शाखेचे योगेश कोकणे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर सरोदे आदी घटनास्थळी लगेच पोहोचले. येथे अशा घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे बचाव कार्यासाठी मदत करणारे भोई, देविदास भटेवाड, दिलीप तुमलवाड, विवेकांनद पाटील, संभाजी झाडे, नामदेव राठोड, अरविंद राठोड, सदिंप काळे, सयाजी टेकलवाड, साईनाथ वासेवाड यांना सोबत घेवून दोरीच्या सहाय्याने सातही पर्यटकांना तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले.पर्यटकात श्यामराव झिंगू राठोड (रा़राजगड वय ७०), कांताबाई चव्हाण (रा़बोधडी, वय ४०), जनार्धन गायकवाड (रा़चिखलीकर, वय २२), संदीप ग्यानबा नरवाडे (राग़ोकुंदा वय), रवीराम राठोड (रा़चिंचोली, वय २७), तोतीबाई राठोड (रा़बोधडी, वय ७०), गोची बळीराम जाधव (रा़मुरली) यांचा समावेश होता.घटनेची माहिती मिळताच किनवटचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार नरेंद्र देशमुख, मंडळ अधिकारी लोढे इस्लापूरचे स.पोनि रामेश्वर कायंदे या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट घेवून याबाबत संपूर्ण माहिती घेतली़