लासूर-स्टेशन : थर्टीफर्स्टच्या रात्री दारू पाजली नाही म्हणून सात जणांनी २३ वर्षीय तरुणास फायटर, चाकूने जबर मारहाण केली़ ही घटना ३१ डिसेंबर रोजी लासूर स्टेशन येथे घडली होती़ या प्रकरणी रविवारी (ता. ३) शिल्लेगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस म्हणाले योगेश व्यवहारे याने फिर्यादीत नमूद केले की, ३१ डिसेंबर रोजी जाधव चौकाजवळ विजय मोकळे, प्रशांत विजय गायकवाड, प्रमोद धनाजी त्रिभुवन हे तिघे भेटले़ तेव्हा मोकळेने आज थर्टीफस्ट आहे़ आम्हाला दारू पाज, अशी मागणी केली़ मात्र, इन्कार केला़ तेव्हा प्रशांत व प्रमोद यांनी शिवीगाळ करून दारू पाज नाही तर तुला जाऊ देणार नाही असे म्हणाले. दरम्यान, योगेशने तिथून निघण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुन्हा शिवीगाळ केली़ यादरम्यान, आवाज ऐकून जवळील नीलेश राऊत, स्वप्नील देशमुख यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रशांत गायकवाड याने योगेशला पकडले व विजय मोकळेने मारहाण केली़ तेव्हा प्रशांत गायकवाडने फायटरने योगेशला मारून जखमी केले़ विजय मोकळेने चाकूने पोटात मारण्याचा प्रयत्न केला़ मात्र, हा वार योगेशच्या हातावर लागला़ यानंतर तेथे आणखी चार जण आले़ त्यांनीही फिर्यादीला मारहाण केली़ दरम्यान, रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर त्याने सिल्लोगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ यावरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास स. पो.नि. सूर्यकांत कोकणे करीत आहेत.
दारूसाठी तरुणाला ७ जणांची मारहाण
By admin | Updated: January 4, 2016 00:22 IST