शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीत ६७१ कोटींच्या ठेवी; ९४९ कोटींचे शेतीकर्ज

By admin | Updated: April 16, 2016 23:26 IST

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थीक वर्षाचा हिशोब पुर्ण झाला असून सद्य अहवालावरुन बँक पुर्वपदावर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थीक वर्षाचा हिशोब पुर्ण झाला असून सद्य अहवालावरुन बँक पुर्वपदावर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा विश्वास अध्यक्ष आदित्य सारडा यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सध्या ६७१ कोटींच्या ठेवी, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत कृषी कर्ज ९४९ कोटी ४४ लाख रुपये आहे. कृषी कर्ज हे ८४. ६० टक्के आहे. जिल्ह्यातील साखर कारखाना, सुत गिरणी, औद्यागिक, शिक्षण, संस्था व इतर बिगर शेती संस्थाकडे बँकेचे १०७ कोटी २६ लाख रुपये तर पगारदार संस्थाकडे ६५ कोटी ५२ लाख असे १ हजार १२२ कोटी २२ लाख रुपये कर्ज असल्याची माहिती अध्यक्ष सारडा यांनी दिली. मार्च २०११ अखेर बँकेकडे १ हजार १९७ कोटी ऐवढ्या ठेवी होत्या. म्हणजेच ५२५ कोटी आज पर्यंत ठेवीदारांच्या ठेवी परत केलेल्या आहेत. यामुळे एक वर्षामध्ये ७१ कोटी व्याजारी रक्कम पुर्ण वजा करता ६७१ कोटी इत्या ठेवी शिल्लक आहेत. परंतू बँकेचे मोठ्या प्रमाणात कर्ज येणे आहे. १ हजार १२२ कोटी २२ लाख रुपये इतके कर्ज येणे आहे. म्हणजेच बँकेकडे ४५० कोटी ७७ लाख रुपये स्वनिधी आहे. त्यामध्ये बुडीत व संशयीत कर्ज निधी २१७ कोटी व व्याजापोटीची तरतूद १९९ कोटी ९९ लाख रुपये आहे. नियमाप्रमाणे सरकारी कर्जरोख्यात एकुण ७१ कोटी ६६ लाख रुपये म्हणजे १० टक्के रक्कम गुंतवली आहे. राज्य बँकेमध्ये १६३ कोटी ठेवी आहेत तर बँकेकडे रोखनिधी ४७ कोटी ६७ लाख रुपये असून बँकेची एकुण गुंंतवणूक २४४ कोटी ३८ लाख आहे. महाराष्ट्र राज्य बँकेकडे डीसीसीचे २१७ कोटी व राज्य बँकेतील मुदतठेवीवर ४७ कोटी ४० लाख रुपये कर्ज आहे असे अध्यक्ष सारडा म्हणाले. बँकेचे संचालक मंडळ डीसीसी पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत आहेत. त्या टप्या-टप्याने काढाव्यात असे आवाहन सारडा यांनी केले. बँकेचे उपाध्यक्ष गोरख धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विकासराव देशमुख, उपव्यवस्थापक रवी उबाळे, दिपक तळकरी, बँकेचे कर्मचारी सचिन गायकवाड, मन्सुर पठाण, उपरे, वाघमारे, कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)