शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ वर्षांच्या वृद्धाला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:22 IST

६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा ६४ वर्षांचा नातेवाईक गणी चाँद खान पठाण याला सोमवारी (दि.२२) सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे गुन्ह्यानंतर अवघ्या दीड वर्षांत आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ठळक मुद्देगुन्ह्यानंतर अवघ्या दीड वर्षात आरोपीला शिक्षा

औरंगाबाद : ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा ६४ वर्षांचा नातेवाईक गणी चाँद खान पठाण याला सोमवारी (दि.२२) सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे गुन्ह्यानंतर अवघ्या दीड वर्षांत आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.या संदर्भात पीडित मुलीच्या आईने सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, १६ आॅक्टोबर २०१७ रोजी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी गणी चाँद त्यांच्या घरी आला. त्यावेळी मुलगी तिच्या वहिनीचा मोबाईल आणण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली होती. मोबाईलला रेंज नसल्याचे कारण देत गणी देखील वरच्या मजल्यावर गेला. बराच वेळ गणी तसेच मुलगी खाली आली नाही, म्हणून फिर्यादीची सून वरच्या मजल्यावर गेली असता, गणी तिच्यासोबत दुष्कृत्य करताना दिसून आला. फिर्यादीच्या सुनेला पाहून त्याने सारवासारव केली. सून मुलीला घेऊन खाली आली. गणीदेखील खाली आला. गणी निघून गेल्यानंतर सुनेने घडला प्रकार सासूला सांगितला. मात्र गणी नातेवाईक असल्याने बदनामी होईल, या हेतूने फिर्यादीने तक्रार दिली नव्हती.दोन-तीन दिवसांनी मुलीला त्रास सुरू झाल्यावर तिला खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीला घाटी दवाखान्यात पाठविले. घाटीत ‘एमएलसी’ची नोंद होऊन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा वैद्यकीय अहवाल देण्यात आला. फिर्यादीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादी, पीडित मुलगी व सून आणि २ डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने गणी चाँद याला भादंविच्या कलम ३७६ (२) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय