नांदेड : जिल्हा परिषद कृषी विभागातंर्गत विशेष घटक योजना, ओटीएसपी व टीएसपी ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत गत पाच वर्षांत विहिरीमुळे जिल्ह्यातील सिंचनक्षेत्रात ६२५ हेक्टरने वाढ झाली आहे.२००७-८ या वर्षात विशेष घटक, ओटीएसपी व टीएसपी योजनेंतर्गत १६९ लाभार्थ्यांनी विहिरींचा लाभ घेतला. यामुळे जिल्ह्यातील सिंचनक्षेत्र १६९ हेक्टरने वाढले. २००८-९ या वर्षात २६६ हेक्टरने वाढ, २००९-१० या वर्षात ४६ हेक्टर, सन २०१०-११ वर्षात ६४ हेक्टरने तर २०११-१२ या वर्षात ८० हेक्टर याप्रमाणे जिल्ह्यात विशेष घटक योजनेचा ४६५, ओटीएसपी ११२ तर टीएसपी योजनेंतर्गत ४८ लाभार्थ्यांनी विहिरींचा लाभ घेत कोरडवाहू शेती बागायती केली. लाभार्थी शेतकऱ्यांचे अथक परिश्रम व कृषी विभाग यांच्याकडून विहिरींसाठी मिळणारे अर्थसहाय्य यामुळेच जिल्ह्यातील सिंचनक्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली.जिल्ह्यातील जास्तीत जास्त कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ व्हावा व त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होवून त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, हा मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्यात सिंचनक्षेत्रात ६२५ हेक्टरने वाढ
By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST