औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या १५१ ने वाढविण्यात आली असून, यंदा विभागात ६०९ मतदान केंद्रे असतील. दरम्यान, या निवडणुकीसाठी २७ मेपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. सार्वजनिक सुटी वगळता ३ जूनपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० जून रोजी मतदान होईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज याविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार, समन्वयक तथा उपायुक्त डॉ.विजयकुमार फड उपस्थित होते. यावेळी मतदारांची संख्या ९५ हजारांनी वाढली आहे. यावेळी विभागात एकूण ३ लाख ६८ हजार पदवीधर मतदार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. विभागात यावेळी एकूण ६०९ मतदान केंद्रे राहणार आहेत. निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचाच वापर होणार आहे. पदवीधर मतदारसंघाचे मतदान हे पसंतीक्रमानुसार असते. यामध्ये मतदार एकापेक्षा जास्त उमेदवारांना पसंतीक्रमाने मत देतात. मतदान यंत्रात एकापेक्षा जास्त उमेदवारांना उतरत्या क्रमाने मतदान नोंदविण्याची सोय नाही. डिपॉझिट पाच हजार रुपये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोगाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच हजार आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी अडीच हजार रुपये अनामत रक्कम ठरवून दिली आहे. उमेदवारी अर्जासोबत ही रक्कम जमा करावी लागणार आहे. जिल्हामतदारकेंद्रे औरंगाबाद१,0७,०२९१७४ जालना२४,४४३५२ परभणी३१,२०२५५ हिंगोली११,३१६२७ नांदेड४३,३३८७५ बीड५९,४७०९२ लातूर५१,७७३७६ उस्मानाबाद३९,८१४५८ एकूण३,६८,३८५६०९ शेवटचा दिवस ३ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ मेपासून सुरुवात होत असून, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ३ जून आहे. मराठवाड्यात एकाच ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
पदवीधरसाठी मराठवाड्यात ६०९ मतदान केंदे्र
By admin | Updated: May 27, 2014 01:21 IST