शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

६० टक्के विद्यार्थी वंचित राहणार

By admin | Updated: January 22, 2016 00:20 IST

नजीर शेख , औरंगाबाद राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा मोठा गाजावाजा केला असला तरी सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांना

नजीर शेख , औरंगाबादराज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा मोठा गाजावाजा केला असला तरी सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभच मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे राज्य सरकारची परीक्षा शुल्कमाफीची घोषणा ही फसवी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी घोषित केलेल्या टंचाईग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासंबंधीचे प्राथमिक आदेश २० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्य शासनाच्या आदेशांचा संदर्भ देऊन १३ जानेवारी २०१६ रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार दुष्काळग्रस्त गावांतील शासकीय व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (ईबीसीधारक) विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र राहतील. विद्यापीठाने यासाठी उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पत्राचा संदर्भ दिला आहे. त्याशिवाय १९९३ सालच्या शासन आदेशाचाही संदर्भ देण्यात आला आहे. शिक्षण सहसंचालकांनी केवळ ईबीसी विद्यार्थ्यांनाच परीक्षा फी माफीची सवलत लागू राहील, असे आपल्या आदेशात कुठेही म्हटले नाही; मात्र विद्यापीठाच्या परिपत्रकात ही अट टाकण्यात आली आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थी हे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांतील विद्यार्थी आहेत. त्यांचे प्रवेशही कायदेशीर आहेत. केवळ शासनाकडे शिक्षणाला पैसा नाही म्हणून हे विद्यार्थी स्वत:च्या खिशाला चाट लावून विनाअनुदानित महाविद्यालयांत प्रवेश घेतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर ७० टक्के विद्यार्थी हे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी दुष्काळग्रस्त भागातील असूनही त्यांना परीक्षा फीमाफीचा लाभ मिळणार नाही. काही संस्थाचालकांनी ते विद्यार्थ्यांकडून वसूलही केले आहे. शिक्षण संचालकांनी यासंदर्भात ३ डिसेंबर २०१५ रोजी काढलेल्या आदेशात टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी घेण्यात येऊ नये, असे आदेश काढले असले तरी ते आदेश अनुदानित महाविद्यालयांसाठीच आहेत की, सर्वच महाविद्यालयांसाठी आहेत याचा उलगडा होत नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते राहुल तायडे यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्त विद्यार्थी कोणत्याही महाविद्यालयात शिकत असला तरी त्याची फी माफ व्हावी ही मागणी शासनाने मान्य केली आहे. मात्र, विनाअनुदानित महाविद्यालयांतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल करणे अन्यायकारक ठरेल. प्राप्त माहितीनुसार दरवर्षी विद्यापीठाच्या परीक्षांना साडेतीन लाख विद्यार्थी बसतात. यापैकी सुमारे पावणेदोन लाखापेक्षाही अधिक विद्यार्थी हे विनाअनुदानित महाविद्यालयांतील असतात. ४सद्य:स्थितीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकक्षेत एकूण ३८० महाविद्यालये आहेत. यापैकी १५० महाविद्यालये विनाअनुदानित तत्त्वावरील आहेत. या महाविद्यालयांतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीचा लाभ मिळणार नाही.