उस्मानाबाद : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीपोटी शासनाकडून पहिल्या टप्प्यात ७३ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३३२ गावांतील १ लाख ५४ हजारांवर शेतकऱ्यांना यातील ६० कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.जिल्ह्यात ७३७ गावे असून यातील ३६२ गावे खरिपाची तर ३७५ रबीची आहेत. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. तसेच सोयाबीन पिकांचे उत्पन्न ७० टक्यांनी घटले होते. जिल्ह्यात खरीप पिकांची पैसेवारी ४४ पैसे जाहीर करण्यात आली होती. ३१८ गावातील पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी असल्याने शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १७६ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी प्रशासनांच्या वतीने करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात ७३ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान प्रशासनाला १२ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. सात तालुक्यातील ३३२ गावातील १ लाख ५४ हजार १३१ शेतकऱ्यांना ६० कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीधर तांबे यांनी दिली. (प्रतिनिधी)
साठ कोटींची मदत वाटप
By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST