शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

बायजीपुऱ्याला ६० फुटांचा रस्ता

By admin | Updated: December 18, 2015 23:50 IST

औरंगाबाद : विकास आराखड्यातील नियोजित रस्ता मोकळा करण्यासाठी शुक्रवारी बायजीपुऱ्यात सक्तीची भूसंपादन मोहीम राबविण्यात आली.

औरंगाबाद : विकास आराखड्यातील नियोजित रस्ता मोकळा करण्यासाठी शुक्रवारी बायजीपुऱ्यात सक्तीची भूसंपादन मोहीम राबविण्यात आली. रस्त्याआड येणाऱ्या सर्व १७ मालमत्ता बुलडोझरच्या साह्याने दिवसभरात जमीनदोस्त करण्यात आल्या. किरकोळ विरोध वगळता ही कारवाई शांततेत पार पडली. तहसील कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोरून बायजीपुऱ्याकडे ६० फूट रुंद रस्ता जातो. परंतु अपेक्स रुग्णालयाच्या पुढे हा रस्ता मध्येच थांबलेला होता. तेथे रस्त्यात १७ मालमत्तांचा अडथळा होता. महानगरपालिकेने तहसील कार्यालयामार्फत भूसंपादनाची कारवाई केली होती. २००२ मध्ये प्रक्रिया पूर्ण झाली. मनपाने २००७ साली भूसंपादनाचा मोबदलाही तहसील कार्यालाकडे जमा केला. परंतु मालमत्ताधारक जागेचा ताबा देण्यास तयार (पान १ वरून) झाले नाहीत. त्यामुळे हा रस्ता रखडला होता. शेवटी आज याठिकाणी सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविली. तहसील कार्यालय आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी आज दुपारी १२ वाजता येथे पोहोचले, पण त्याआधीच नागरिकांनी घरे रिकामी केली होती. त्यामुळे लगेचच जेसीबीच्या साह्याने कारवाईला सुरुवात करण्यात आली. रस्त्याआड येणारी एकेक घरे भुईसपाट करण्यात आली. दिवसभरात सर्व १७ मालमत्ता पाडून रस्ता मोकळा करण्यात आला. सुमारे १२५ मीटर अंतरात या मालमत्ता पसरलेल्या होत्या. ही घरे हटविल्यामुळे आता एसएफएससमोरून निघणारा रस्ता सरळ समोर बायजीपुऱ्यातील दुसऱ्या रस्त्याला मिळाला आहे. ताबा पावती देण्यावरून किरकोळ विरोध वगळता कारवाई शांततेत पार पडली. दोन-चार घरे स्लॅबची तर उर्वरित घरे पत्र्यांची असल्यामुळे जेसीबीने सफाया करण्यात आला. कारवाईला दोन तास उशीर मनपा आणि तहसील कार्यालयाने कारवाईसाठी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेचा मुहूर्त काढला होता. परंतु प्रत्यक्षात कारवाई सुरू होण्यासाठी दोन तास उशीर झाला. नियोजित वेळेप्रमाणे या भागात सकाळीच तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे पथकही दाखल झाले. रस्त्यालगतच्या खांबांवरील वीजपुरवठा बंद करण्यात आला. मनपा आणि तहसीलचे कर्मचारी ११.३० वाजता दाखल झाले. परंतु पाडापाडीसाठी जेसीबी आणि बुलडोझर मात्र आले नव्हते. ते पोहोचल्यानंतर दुपारी १२.३० वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली.