शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

१६ महिन्यांत ६ लाख नागरिकांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:04 IST

राम शिनगारे औरंगाबाद : मराठवाड्यात कोविड-१९चा पहिला रुग्ण औरंगाबाद शहरात १६ मार्च २०२० रोजी आढळला होता. यानंतर मागील १६ ...

राम शिनगारे

औरंगाबाद : मराठवाड्यात कोविड-१९चा पहिला रुग्ण औरंगाबाद शहरात १६ मार्च २०२० रोजी आढळला होता. यानंतर मागील १६ महिन्यांत तब्बल ६ लाख ५ हजार ३४३ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत १४ हजार ७३१ जण आपल्या प्राणाला मुकले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यात ३ हजार ४४२ झाले असून, त्यानंतर बीड जिल्ह्यात २ हजार ५४२ मृत्यू झाले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही ५ लाख ८७ हजार ३०५ एवढी आहे.

चीनमधून जगभरात कोविड-१९ विषाणूचा फैलाव होण्यास मार्च २०२० च्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. त्यामुळे मार्चच्या मध्यात महाराष्ट्रात दक्षता घेण्यासाठी राज्य शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. याच काळात १६ मार्चला रशियाहून आलेल्या एका महिला प्राध्यापिकेचा घेतलेला स्वॅब पॉझिटिव्ह आला. तेव्हा या स्वॅबची तपासणी पुण्यातील एनआव्ही केली होती. या पहिल्या रुग्णामुळे मराठवाड्यात प्रचंड दहशत पसरली. यानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. सुरुवातील औरंगाबाद शहरात ही संख्या अधिक होती. त्यानंतर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही याचा फैलाव झाला. पहिली लाट ओसरल्यानंतर दुसऱ्या लाटेने मराठवाड्यात विळखा घातला होता. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार मार्च २०२० पासून ६ जून २०२१ पर्यंत मराठवाड्यात ६ लाख ५ हजार ३४३ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यातील १४ हजार ७३१ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५ लाख ८७ हजार ३०५ एवढी आहे. आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्टचा पॉझिटिव्हि रेट १२.९२ टक्के असून, कोरोनामुक्तचा रिकव्हरी रेट ९७.०२ टक्के एवढा असल्याचेही आकडेवारी स्पष्ट झाले. सध्या मराठवाड्यात ३ हजार ३०७ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत.

चौकट

४६ लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील एकूण लोकसंख्येपैकी तब्बल ४६ लाख ८६ हजार १२० नागरिकांच्या आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात २० लाख ८१ हजार ९२० आरटीपीसीआर टेस्ट असून, २६ लाख ४ हजार २०० अँटिजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. दोन्हींचा मिळून १२.९२ टक्के पॉझिटिव्हिटी रेट असल्याचेही स्पष्ट झाले.

बॉक्स

मराठवाड्यातील ६ जून २०२१ पर्यंतची आकडेवारी जिल्हा रुग्ण मृत्यू

औरंगाबाद १,४६,४३७ ३४४२

जालना ६१,२५९ ११६८

परभणी ५०,९६३ १२८३

हिंगोली १५,९५१ ३८४

नांदेड ८८,७५० २१५७

बीड ९२,६२३ २५४२

लातूर ९०,६४७ २४०४

उस्मानाबाद ५८,७१३ १३५१