लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाण्यात शुक्रवारी रात्री घराची भिंत पडल्याने एका बालकाचा मृत्यू झाला आणि पूल ओलांडताना एक तरुण वाहून गेला. तोच शनिवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना भरधावजीपने चिरडले. शहरात असूनही गावपण जपलेल्या चिकलठाणाकरांमध्ये या तिन्ही घटनांनी शोककळा पसरली.चिकलठाणा येथील ७० टक्के लोक आजही शेती करून आपली उपजीविका भागवितात. येथील दहीहंडे गल्लीतील जुन्या माळवदाच्या घराची भिंत शुक्रवारी रात्री साडेसहा ते पावणेसात वाजेच्या सुमारास कोसळली. या घटनेत शंकर ऊर्फ कन्हैया विलास लाड हा ११ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. त्याची बहीण अयोध्या गंभीर जखमी झाली. या भीषण घटनेप्रसंगी गावातील अनेक जण लाड परिवाराच्या मदतीला धावले. गावातील एका शेतकºयाकडे काम करणारा कृष्णा नवनाथ कोरडे (२८) हा तरुण मित्रासोबत शुक्रवारी रात्री दुचाकीने शेतात जात होता. विमानतळ भिंतीमागील नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. या पाण्याचा त्यास अंदाज आला नाही. तो दुचाकीवरून पूल ओलांडत असताना वाहून गेला. ही घटना समजल्यानंतर गावातील तरुण आणि अग्निशमन दलाचे जवान शनिवारी सकाळपासून त्याचा शोध घेत होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास कृष्णाचा मृतदेह सापडला. मात्र, त्याचा मित्र अद्यापही गायब आहे. तत्पूर्वी पहाटे पाच वाजता गावातील हनुमान चौकात राहणाºया सहा जणांचा ग्रुप नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेला होता. एका सुसाट कारने त्यांना मागून चिरडले. या अपघातात चार जण जागीच ठार झाले आणि दोन जण जखमी झाले.ही घटना कळताच गावातील अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. सलग दोन दिवसांत तीन दुर्घटना घडल्याने चिकलठाण्यावर शोककळा पसरली होती. हनुमान चौक परिसरातील एकाही दुकानदाराने आपले दुकान शनिवारी उघडलेनाही.
२४ तासांत ६ जणांचा मृत्यू; चिकलठाण्यावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:06 IST