शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

६ कोटींची रस्ता कामे कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:59 IST

सार्वजनिक विभागाच्या अखत्यारीत येणा-या रस्त्यांलगत फोर-जी इंटरनेट केबल टाकण्यासाठी खोदकामापोटी मिळालेली रक्कम पैठण तालुक्यातील १०४ कामांवर खर्च करण्यात आली. विशेष म्हणजे ही कामे कागदावरच उरकून तब्बल ६ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे बांधकाम विभागातील दोन वर्षांमध्ये बदलून गेलेले सर्व अभियंते संशयाच्या भोव-यात आले आहेत.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक विभागाच्या अखत्यारीत येणा-या रस्त्यांलगत फोर-जी इंटरनेट केबल टाकण्यासाठी खोदकामापोटी मिळालेली रक्कम पैठण तालुक्यातील १०४ कामांवर खर्च करण्यात आली. विशेष म्हणजे ही कामे कागदावरच उरकून तब्बल ६ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे बांधकाम विभागातील दोन वर्षांमध्ये बदलून गेलेले सर्व अभियंते संशयाच्या भोव-यात आले आहेत.औरंगाबाद शहरातील रस्ते खोदले आणि त्यातून पैठणमध्ये कामे करण्यात आल्यामुळे विभागातील यंत्रणा संशयाच्या भोव-यात सापडली असून, शहरातील अनेक रस्ते खड्ड्यांत गेलेले असताना पैठणमध्ये कुणाच्या दबावाखाली ही कामे कागदोपत्री करण्यात आली. या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता पी.आय. सुखदेवे, उपविभागीय अभियंता एन.जी. वैष्णव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असला तरी सहा कोटींतून झालेल्या कामांचे काय हा प्रश्न कायम आहे.याप्रकरणी समोर आलेली माहिती अशी, तीन वर्षांत रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीने इंटरनेटसाठी केबल टाकण्याच्या कामासाठी बांधकाम विभागाकडे असलेले रस्ते खोदले. त्या रस्त्याच्या डागडुजीसाठी कंपनीने बांधकाम विभागाला दोन टप्प्यांत सुमारे सहा कोटी रुपये दिले.महावीर चौक ते चिकलठाणा (जालना रोड), महावीर चौक ते पंढरपूर या दोन रस्त्यांलगत व मधोमध खोदकाम करून ओएफसी केबल टाकण्याचे काम २०१४ ते १५ या वर्षभरात करण्यात आले. यासाठी रिलायन्सने दोन टप्प्यांत सहा कोटी रुपये बांधकाम विभागाला दिले. ही रक्कम जालना रोड आणि पंढरपूर रोडच्या डागडुजीसाठी वापरणे गरजेचे असताना पैठण उपविभागामधील १०४ रस्त्यांच्या कामावर खर्च केल्याचे दाखविण्यात आले. हा सगळा कागदोपत्री झाल्याचा दाट संशय असून, यामध्ये स्थानिक पातळीपासून वरिष्ठ अधिकाºयांनी डोळेझाक केली आहे.इंटरनेट केबल टाकण्यासाठी साइडड्रेनप्रमाणे रस्ता खोदण्यात आला. तसेच क्रॉसिंग करण्यासाठी खोदकाम करण्यात आले. तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी ६ कोटी रुपये शहरात खर्च होणे अपेक्षित होते; परंतु पैठण तालुक्यात ती रक्कम कुणाच्या आदेशाने वळविण्यात आली. शिवाय त्या तालुक्यातील १०४ कामे कुणाला देण्यात आली. त्याच्या निविदा कधी काढण्यात आल्या होत्या.कोणते रस्ते खोदलेनगर नाका ते महावीर चौक दोन्ही बाजूंनी ३ कि़मी., नगरनाका ते आर्मी बी.आर.ए. ७०० मीटर, जामा मशीद ते पंढरपूर रोड साडेपाच कि़मी., जळगाव रोड ते जळगाव टी-पॉइंट दोन कि़मी., एसबीआय रिजनल आॅफिस ते जळगाव रस्ता दोन कि़मी., एपीआय कॉर्नर ते मुकुंदवाडी अर्धा कि़मी., रामनगर ते धूत हॉस्पिटल पाऊण कि़मी., धूत हॉस्पिटल ते केम्ब्रिज स्कूल साडेचार कि़मी. हे रस्ते रिलायन्सने खोदले. त्यासाठी २ कोटी ९५ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम बांधकाम विभागाला दिली.त्यानंतर औरंगाबाद- जालना रस्ता साडेचार कि़मी.पर्यंत खोदला. एपीआय कॉर्नर ते रामनगर एक कि़मी. रस्ता खोदला. त्यासाठी २ कोटी ९३ लाख ७० हजार रुपये बांधकाम विभागाला कंपनीने दिले. या रकमेतून हेच रस्ते दुरुस्त होणे गरजेचे असताना ते पैठण उपविभागातील १०४ रस्त्यांवर कागदोपत्री वळविण्यात आले. याप्रकरणी विद्यमान अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, यात नेमके काय झाले आहे ते पाहावे लागेल.औरंगाबाद ते पैठणवर खर्च केले कोट्यवधीरिलायन्सकडून मिळालेल्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ३ कोटींतून पैठण ते शहागड रोड व पैठण ते पाचोड या रोडवर व औरंगाबाद ते पैठण रोडवर सुमारे सव्वाकोटीचा चुराडा करण्यात आला. त्यानंतर तुळजापूर ते विहामांडवा, शेवगाव ते पैठण या रोडवर एक कोटी खर्च करण्यात आला. उर्वरित रक्कमदेखील याच तालुक्यात खर्च करण्यात आली.दुसºया टप्प्यातील ३ कोटींतून औरंगाबाद ते पैठण या राज्य महामार्ग २६ वर वेगवेगळे तुकडे करून दीड कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मुळात औरंगाबाद ते पैठण या रस्त्यावर बिडकीनपर्यंत १० कोटी रुपयांतून फेबु्रवारी २०१७ मध्ये विशेष बाब म्हणून खर्च करण्यात आला. मग दीड कोटी रुपयांतून विभागाने काय केले, हा प्रश्न आहे.पैठण ते शहागड, पैठण ते पाचोड रोडचेही काम यातून केल्याचे दाखविण्यात आले आहे. कचनेर ते पोरगाव, बिडकीन रोड या राज्य महामार्ग क्र.२१५ साठी ३ लाख रुपयांपर्यंतच्या कामांचे ४२ तुकडे करण्यात आले. १ कोटी २६ लाख रुपयांची ही कामे मर्जीतील गुत्तेदार आणि मजूर सहकारी संस्थांना देण्यात आली. ही कामे झाली की नाही, याचा हिशेब अद्याप समोर आलेला नाही.