शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ लाख जनधन खात्यात ५८७ कोटींच्या ठेवी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 23, 2024 11:50 IST

सरकारी योजनांची रक्कम थेट जनधन खात्यात जमा होत असल्याने व बँकेत खाते उघडल्यास त्याचे लाभ लक्षात येऊ लागल्याने जनधन खाते उघडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

छत्रपती संभाजीनगर : जनधन योजनेचा उद्देश गरीब आणि वंचित जनतेपर्यंत आर्थिक सेवेचा लाभ पोहोचविणे. यासाठी गरिबांचे बँक खाते उघडणे, त्यांना बँकिंग सुविधा प्रदान करणे आहे. तळागळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. याची फलनिष्पत्ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर १४ लाख खातेदारांच्या खात्यात आजघडीला ५८७ कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत.

मागील तीन वर्षांत वाढले १ लाख नवीन खातेदारसरकारी योजनांची रक्कम थेट जनधन खात्यात जमा होत असल्याने व बँकेत खाते उघडल्यास त्याचे लाभ लक्षात येऊ लागल्याने जनधन खाते उघडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. मागील तीन वर्षात १ लाख ४ हजार नवीन खात्यांची भर पडली आहे.

वर्षभरात वाढल्या १४२ कोटींच्या ठेवीमार्च २०२३ या आर्थिक वर्षात १३ लाख ५४ हजार जनधन खातेदारांची नोंद होती. ४४५ कोटी रुपये जमा झाले होते. यात मार्च २०२४ मध्ये १४ लाख ६३ हजार खात्यात ५८७ कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत. वर्षभरात १४२ कोटींच्या ठेवींची भर पडली, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली.

बँकामधील जनधन खाते व त्यातील ठेवींचा वाढता आलेखवर्ष--------- खाते---------- ठेवींची रक्कममार्च २०२२ -- १३ लाख ३९ हजार---३९१ कोटीमार्च २०२३---१३ लाख ५४ हजार--- ४४५ कोटीमार्च २०२४--- १४ लाख ६३ हजार--- ५८७ कोटी

दीड लाख खात्यात शून्य रक्कमएकीकडे १४ लाखांपेक्षा अधिक जनधन खात्यात ५८७ कोटी ठेवी जमा झालेल्या असताना. १ लाख ४३ हजार खाती अशी आहेत ज्यात आजही शून्य टक्के रक्कम आहे. मागील आर्थिक वर्षात व चालू आर्थिक वर्षात खाते तेवढेच व रक्कमही शून्य आहे, यात काहीच बदल झाला नाही.

जनधन खाते कोण उघडू शकते?१) आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना खाते उघडता येते२) जे लोक अद्यापपर्यंत बँकिंग प्रणालीशी जोडलेले नाहीत.३) खिशात पैसे नसले तरी खाते उघडता येते.४) खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास कोणताही दंड भरावा लागत नाही.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद