शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र माहूरगडावर ५८ सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:51 IST

साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे शारदीय नवरात्र महोत्सवाची माहूरगडावर तयारी सुरू झाली आहे़ संस्थानच्या वतीने स्वच्छता आणि सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असून संपूर्ण श्रीक्षेत्र माहूरगडावर तब्बल ५८ सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे शारदीय नवरात्र महोत्सवाची माहूरगडावर तयारी सुरू झाली आहे़ संस्थानच्या वतीने स्वच्छता आणि सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असून संपूर्ण श्रीक्षेत्र माहूरगडावर तब्बल ५८ सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे़नवरात्रोत्सव काळात लाखो भक्त आई रेणुकादेवीच्या दर्शनासाठी येतात़ या काळात पहाटे पाच ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते़ दरम्यान, २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी संस्थानच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरु आहे़ उत्सवात पारंपरिक पूजाअर्चा व सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत़ यामध्ये ललित पंचमीनिमित्त २४ रोजी प्रख्यात गायक पं. सुधीर फडके यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल़संस्थानतर्फे मंदिर रंगरंगोटी, विद्युत व्यवस्थेचे सुसूत्रीकरण, भाविकांची सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे संस्थानचे विश्वस्त समीर भोपी यांनी सांगितले़ सुरक्षेबरोबरच भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे़ यासाठी विविध आरोग्य पथके, रूग्णवाहिका आणि भाविकांना पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था केली जाणार आहे़ गडावरील स्वच्छतेसाठी ११ नियमित कर्मचारी असून उत्सवकाळासाठी तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेनुसार सफाई कर्मचारांची नियुक्ती केली जाणार आहे़ अग्निशमन दलास उत्सव काळात पाचारण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अखंडित वीजपुरवठ्यासाठी जादा क्षमतेचे जनरेटर खरेदी केले आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, संस्थानचे पदसिद्ध सचिव तथा उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख, संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे़यावेळी विश्वस्त संजय काण्णव, चंद्रकांत भोपी, गाभारा पुजारी शुभम भोपी, मानकरी अश्विन भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे, मुख्य सुरक्षा अधिकारी सुभेदार, प्रकाश सरोदे यांची उपस्थिती होती.