बीड : खाजगी प्राथमिक व माध्यमिक संस्थांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शेकडो शिक्षकांचे आॅनलाईन समायोजन गतवर्षी करण्यात आले होते. मात्र संस्था चालकांनी रुजू करुन न घेतल्याने ५५ शिक्षक पदस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत.२०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार खाजगी माध्यमिक विभागांतर्गत १६२ तर प्राथमिक विभागात २६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. खाजगी संस्थांमधील १६२ पैकी ६८ तर प्राथमिक विभागातील २६ पैकी केवळ ८ शिक्षकांचे समायोजन झाले आहे. प्राथमिकमधील ८ शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. उर्वरित १० जणांना संस्थांनी रुजू करुन न घेतल्यामुळे शिक्षण विभागाने संबंधित संस्थांचे १० पदे गोठविले आहेत. दरम्यान, माध्यमिक विभागातील ४५ व प्राथमिक विभागातील १० अशा एकूण ५५ शिक्षकांची पदस्थापनेची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे या शिक्षकांचे जिल्हा परिषदेमध्ये हेलपाटे सुरू असून, अनेकांच्या वेतनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.मे महिन्यात आॅनलाईन समायोजन२०१५-१६ व २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार खाजगी माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील अनुदानित पदांवरील अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजनाची प्रक्रिया मे महिन्यात राबविण्यात येणार आहे. ५ ते १० एप्रिल दरम्यान संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी अंतिम करावयाची आहे. १० ते २२ एप्रिल दरम्यान अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदे याबाबत माहिती सादर करावयाची आहे. १७ ते ३१ मे दरम्यान जिल्हास्तरावर आॅनलाईन समायोजन प्रक्रिया राबवून त्याची शासनाच्या संकेतस्थळावर नोंद केली जाणार आहे. ३१ मे ही समायोजनासाठी ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
समायोजनानंतरही ५५ शिक्षक अतिरिक्त
By admin | Updated: April 4, 2017 23:16 IST