कमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील टोकन नसलेल्या मात्र बाजार समितीत नोंदणी केलेल्या ४८0४ शेतकºयांच्या ५४ हजार ५१९ क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यासाठी शासनाने परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाºयांनी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडे प्रस्ताव पाठवून केली आहे.हिंगोली जिल्ह्यात तूर खरेदीमध्ये सुरवातीपासूनच सतराशे विघ्न येत आले आहेत. सुरुवातीला खरेदीसच विलंब झाला. खरेदी सुरू झाली तर वादावादीमुळे बराच काळ केंद्र बंद राहिले. त्यानंतर रेटा वाढला अन् खरेदी सुरू झाली तर बारदाना संपला. या नादात शेतकºयांच्या संयमाची जणू परीक्षा पाहिली गेल्याने बाजार समितीत माल आणूक टाकणाºयांची संख्या वाढत गेली. त्यानंतर क्रमांक लागण्यावरून वाद वाढत होते. त्यामुळे ३१ मेपर्यंत तूर खरेदीची मुदत मिळाल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. बाजार समितीने शेतकºयांची केवळ नोंदणी करून घेतली अन् टप्प्याटप्प्याने टोकन दिले जात होते. तेवढेच शेतकरी बाजार समितीत आल्यानंतर मोजणीची प्रक्रिया सुरळीत चालावी, यासाठी हे केले. मात्र शासनाने ३१ आॅगस्टपर्यंत तूर खरेदी करण्याचा निर्णय घेताना टोकन घेतलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी करण्याची घोषणा केली अन् नोंदणी केलेले शेतकरी लटकले आहेत. याचे खापर बाजार समितीवर फोडले जात असल्याने बाजार समितीने नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने हा प्रस्ताव पाठविण्याची हालचाल केली आहे.
५४ हजार क्ंिवटल तूर शिल्लकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:51 IST