शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ५२ सदस्य नवखे !

By admin | Updated: February 25, 2017 00:29 IST

बीड जिल्हा परिषदेच्या नवनिर्र्वाचित पदाधिकाऱ्यांत ५२ सदस्य नवखे असून ते पहिल्यांदाच राजकारणाचे धडे गिरवणार आहेत.

संजय तिपाले  बीडजिल्हा परिषदेच्या नवनिर्र्वाचित पदाधिकाऱ्यांत ५२ सदस्य नवखे असून ते पहिल्यांदाच राजकारणाचे धडे गिरवणार आहेत. सोबतच ८ जुन्या पदाधिकाऱ्यांना सदस्यपद कायम ठेवण्यात यश आले. आता सभापतीपदी नव्या-जुन्यांपैकी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे आता उत्कंठावर्धक ठरत आहे.६० सदस्यांच्या बीड जिल्हा परिषदेच्या सभागृहाने आतापर्यत दीड डझन नेते घडविले आहेत. जि.प. मधून राजकीय ‘श्रीगणेशा’ केलेल्या या सर्वांनी पुढे लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद गाठली. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या सभागृहास विशेष महत्त्व आहे. पाच वर्षांपूर्वी जि.प. चे एकूण संख्याबळ ५९ होते. यावेळी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यात एकाची भर पडली आहे. नवीन ६० पैकी ८ सदस्यांच्या गाठीशी अनुभवाची शिदोरी आहे. राकॉचे विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, अनूसया सोळंके, सेनेचे युद्धजित पंडित, काकू- नाना आघाडीचे संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या जयश्री मस्के, काँग्रेसच्या आशा दौंड, भाजपच्या सविता गोल्हार यांचा यात समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे पाच वर्षांच्या कार्यकाळात यापैकी जयश्री मस्के व सविता गोल्हार वगळता इतर सहा जण ‘किंगपोस्ट’ राहिलेले आहेत. विजयसिंह पंडित यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली तर आशा दौंड यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला. संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, युद्धजित पंडित, अनूसया सोळंके यांनी सभापतीपदे भूषविली. हे सर्व पदाधिकारी आता नव्या ५२ सदस्यांना मार्गदर्शक ठरू शकतात.सोळंके अन् जिल्हा परिषदपूर्वापार नाते मिनी मंत्रालय व सोळंके घराण्याचे पिढ्यान्पिढ्यांचे नाते आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व. सुंदरराव सोळंके १९६० च्या दशकामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांचे पुत्र प्रकाश सोळंके हे देखील जि. प. मध्ये अपक्ष निवडून गेले होते. नंतर ते आमदार, मंत्री पदावर गेले. धैर्यशील सोळंके यांनी सभापतीपद भूषविलेले आहे. आता सोळंके कुटुंबातील दोन सदस्य जि.प. त पोहचले आहेत. मंगल प्रकाश सोळंके व जयसिंह सोळंके यांनी विक्रमी मतांसह विजयश्री खेचून आणली. जयसिंह यांच्या रूपाने सोळंके घराण्यातील तिसरी पिढी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाली.