शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेले ५० टक्के मोबाइल शोधले सायबर क्राइम सेलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:50 IST

जानेवारीपासून आॅक्टोबरअखेरपर्यंत चोरीला गेलेल्या एकूण मोबाइलपैकी पन्नास ते साठ टक्के मोबाइल शोधून काढण्यात सायबर क्राइम सेलच्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना यश आल्याचे समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाइल चोरी होण्याच्या घटना रोज घडत असतात. जानेवारीपासून आॅक्टोबरअखेरपर्यंत चोरीला गेलेल्या एकूण मोबाइलपैकी पन्नास ते साठ टक्के मोबाइल शोधून काढण्यात सायबर क्राइम सेलच्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना यश आल्याचे समोर आले.गेल्या काही वर्षांपासून मोबाइलची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोबाइल न वापरणारा व्यक्ती सापडणे आता अवघडच झाले आहे. बाजारातील विविध कंपन्या रोज नवीन मॉडेल लाँच करतात. नवीन फीचर्स असलेला मोबाइल खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. महागडे मोबाईल घेतल्यानंतर तो सांभाळून ठेवणेही तेवढेच जिकिरीचे काम आहे. कारण शहराच्या वेगवेगळ्या भागांत रोज सतत मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत.जानेवारीपासून ते आॅक्टोबरअखरेपर्यंत चोरट्यांनी सुमारे ६६० हून अधिक मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी ३३० गुन्ह्यांची नोंद विविध ठाण्यांत करण्यात आलेली आहे. मोबाइल चोरीची फिर्याद नोंदवून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी मोबाइल ट्रेसिंग करण्यासाठी चोरीला गेलेल्या मोबाइलच्या आयएमईआय नंबरची माहिती सायबर क्राइम सेलकडे पाठवितात. बºयाचदा एकाच गुन्ह्यात दोन ते पाच मोबाइल चोरीचे गुन्हे असतात.आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांत दाखल विविध गुन्ह्यांतील चोरीला गेलेल्या ६६० मोबाइलचे आयएमईआय नंबर ट्रेसिंगकरिता सायबर क्राइम सेलला प्राप्त झाले होते. सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी विविध मोबाइल कंपन्यांकडे पत्र पाठवून संबंधित मोबाइलचा आयएमईआय नंबर आॅल इंडिया स्तरावर ट्रेसिंगकरिता लावण्याचे कळविले होते. चोरीला गेलेल्या मोबाइलपैकी ३३० हॅण्डसेट ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले. हे मोबाइल कोठे आहेत आणि कोण वापरत आहे, त्या वापरकर्त्याचे नाव आणि पत्ता पोलिसांनी शोधून काढला. त्याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना कळविली. यातील २०० मोबाइल हॅण्डसेट आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.