शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यातील ५ मंडळात अतिवृष्टी; केळगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:37 IST

तालुक्यातील अंभई , सिल्लोड, अजिंठा ,गोळेगाव, निल्लोड या पाच मंडळात अतिवृष्टी झाली.

सिल्लोड (औरंगाबाद ) : तालुक्यातील अंभई , सिल्लोड, अजिंठा ,गोळेगाव, निल्लोड या पाच मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच जोरदार पावसामुळे केळगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. 

संततधार पावसाने पाच मंडळात अतिवृष्टी झाली असली तरी याने जास्त हानी झाली नाही. उलट खरीप पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले आहे. पावसाचे पाणी शेतातून बाहेर पडले नाही ते शेतातच मुरले. यामुळे शेतातील विहिरीची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मका व कापूस आडवे झाल्याने तुरळक नुकसान झाले आहे. 

सिल्लोड तालुक्यातील आठ महसूल मंडळात पडलेला पाऊस असा:- अंभई 120 मिलिमीटर , सिल्लोड 100 ,अजिंठा 70 ,गोळेगाव 80, निल्लोड 73 मिलिमीटर, भराडी 61,आमठाणा 48,बोरगाव बाजार 68 मिलिमीटर पाऊस झाला. एकूण पाऊस 610 मिलिमीटर झाला.तालुक्याचा सरासरी पाऊस 76.25 मिलिमीटर झाला आहे. तर आता पर्यंत सिल्लोड तालुक्यात एकूण 249.51 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

या पावसामुळे केळगाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहे. प्रकल्पाचा एकूण साठा ३९ टक्क्यावरून ६० टक्क्यांवर गेला आहे. तसेच केळगाव नदीला पूर आल्याने दुपार पासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

पाणी प्रश्न मिटेल...सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी मुळे कुठेच जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. भिज पावसामुळे नक्कीच विहिरींची पाणी पातळी वाढेल.यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल तालुक्यातील टँकर बंद होतील. या पावसाने खूप दिलासा दिला आहे.- संतोष गोरड, तहसीलदार सिल्लोड. 

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूर