शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

५९८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई

By admin | Updated: July 10, 2017 00:32 IST

नांदेड : दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये धाड टाकून ५९८ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये अचानक धाड टाकून तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये ५९८ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून १ लाख ८९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला़ तसेच २० विनापरवाना रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली़दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली जाते़ शनिवारी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती नेहा रत्नाकर यांच्या पथकाने नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविली़ मोहिमेत सहायक वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक अंजी नायक यांचा समावेश होता़ सदर पथकाने पहाटे ४ वाजतापासून कारवाईस सुरूवात करून एका दिवसात एक लाख ८९ हजार रुपये दंड वसूल करून ५९८ प्रवाशांवर कारवाई केली़ यामध्ये नांदेड - आदिलाबाद, औरंगाबाद, परळी अशा विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. कारवाईसाठी बसेस, जीपचा वापर करण्यात आला. धावणाऱ्या रेल्वेमध्ये सेक्शनमध्ये अचानक धाड पडल्याने विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणले. यामध्ये ५९८ विनातिकीट प्रवासी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगीशिवाय जास्त सामान घेवून जाण्यामुळे काही प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातही काही प्रवाशांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विनातिकीट प्रवाशांकडून १ लाख ८९ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत रेल्वे सुरक्षा अधिकारी, ३३ तिकीट तपासणीस, ६ कार्यालयीन कर्मचारी, ५ वाणिज्य निरीक्षक, ३ ट्रॅफिक निरीक्षक, ८ रेल्वे पोलीस फोर्सचे जवान सहभागी होते़ या पथकाने नांदेड विभागातून धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्या तपासल्या़ यामध्ये बरेच प्रवासी सीझन तिकीट घेऊन आरक्षित डब्यात बसले होते तसेच दूधवाले जनरल तिकीट घेऊन प्रवास करत होते. त्यांना अशा प्रकारे प्रवास करता येणार नसल्याचे सांगण्यात आले़ तसेच त्यांनी एम.व्ही.एस.टी. तिकीट घेऊनच प्रवास करावा.