शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

४९ शेतकरी व ९ व्यापाºयांवर गुन्हे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:04 IST

नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील केंद्रांवरील तूर विक्रीचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार आहे.जिल्ह्यात नाफेडने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासह परतूर, तीर्थपुरी, अंबड येथे तूर हमी भाव केंद्र सुरु केले होते. तसेच जालना नाफेड केंद्रावर परजिल्ह्यातील तुरीची विक्री झाल्याने समोर आले. या केंद्रांवर ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाल्याने काही व्यापाºयांनी शेतकºयांच्या नावावर तूर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तशा तक्रारीही प्रशासनाकडे करण्यात आल्या.याची गंभीर दखल घेत यासंदर्भात सविस्तर चौकशीचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. परंतु तूर विक्री केलेल्या संशयास्पद शेतकºयांची संख्या तब्बल ८४०० होती.सर्व कागदपत्रे तपासणे शक्य नसल्याने जालना, परतूर, अंबड व तीर्थपुरी येथील केंद्राशी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पणन विभागाचे अधिकारी, सहनिबंधक कार्यालय, खरेदी विक्री संघाच्या अधिकाºयांच्या चार समित्या गठित करण्यात आल्या.जालना येथील चौकशी समितीने चौकशी अहवाल काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना सादर केला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी चौकशीत दोषी ठरलेल्या ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. परतूर, अंबड व तीर्थपुरी नाफेड केंद्रावर विक्री झालेल्या तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. याचा अहवाल शुक्रवारी पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे.पालकमंत्र्यांनी आढावा बैठक आयोजित केली असून, दोषींवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.