शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

नऊ महिन्यांत ४८४ आत्महत्या; कारणे अनेक; पण कुटुंबियांची साथ, समुपदेशन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:35 IST

आत्महत्येचे मूळ कारण शेवटी निराशाच असते. बहुतांश प्रकरणात तसेच दिसते.

- योगेश पायघनऔरंगाबाद : गेल्या नऊ महिन्यांच्या काळात ४८४ जणांनी आत्महत्या केली. यामध्ये विषारी द्रव घेऊन १९९, गळफास घेऊन २२४, तर जाळून घेत ६१ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रामुख्याने ऑगस्टमध्ये गळफासाच्या घटना वाढल्याचे दिसते. आत्महत्येचे मूळ कारण शेवटी निराशाच असते. बहुतांश प्रकरणात तसेच दिसते.  तज्ज्ञांकडून समुपदेशन, उपचार गरजेचा आहे, असा सल्ला घाटीचे मनोविकृती विभागाचे प्रमुख डाॅ. प्रदीप देशमुख यांनी दिला आहे.

लाॅकडाऊन काळात घटली होती संख्याजानेवारी ३१, फेब्रुवारी १८, मार्चमध्ये २३, एप्रिल ९, मे १६, जून ३५, जुलै २२, ऑगस्ट ४१, अशा १९५ गळाफासाच्या घटनांची शवविच्छेदनगृहात नोंद आहे. जळीत रुग्णांची व जळून मृत्यूची, विषारी औषध प्राशनाने मृत्यू संख्या लाॅकडाऊन काळात घटली होती. मात्र, ही संख्या ऑगस्टनंतर वाढताना दिसत असल्याचे घाटीचे उपाधिष्ठाता व न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डाॅ. कैलास झिने यांनी लोकमतला सांगितले.

अनलॉकमध्ये आत्महत्येचे प्रयत्न करणारे दीडपट वाढलेलाॅकडाऊन काळात आत्महत्येचा प्रयत्न करणारे समुपदेशनासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अनलाॅकनंतर वाढलेले आहे. आठवड्यात किमान १५ पेशंट येत होते. हे प्रमाण लाॅकडाऊनपूर्वी १०, तर लाॅकडाऊनमध्ये २ ते ३ रुग्ण समुपदेशनासाठी घाटीत येत होते. याला कारणे अनेक असू शकतात. आता आत्महत्येचे प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण दीड टक्का वाढलेले दिसत आहे. अनेक प्रकरणात नोकऱ्यांवर गंडांतर, आर्थिक अडचणी, व्यसने आणि कोरोनासोबत नैसर्गिक आपत्ती ही कारणे याला असू शकतात, असे डाॅ. देशमुख म्हणाले.

१९९ जणांनी घेतले विषारी औषधलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील     एकूणपुरुष      ८०     ७१     १५१स्त्री          ३६    १२    ४८

२२४ जणांनी घेतला गळफासलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील     एकूणपुरुष     ८२     ९२            १७४स्त्री    ३६     १४     ५०

६१ जणांनी घेतले जाळूनलिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील      एकूणपुरुष      १४     १८      ३२स्त्री      ११    १८     २९