शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य प्रसूतीद्वारे जन्मले ४.७५ किलो वजनाचे शिशू; जोखमीची प्रसूती झाली यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 20:14 IST

गर्भावस्थेत शिशूचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते.

औरंगाबाद : गर्भावस्थेत शिशूचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान शिशूचे खांदे अडकण्याचा धोका असतो. त्यातून माता आणि शिशू या दोघांच्या जिवाला धोका संभवतो; परंतु शहरातील डॉ. घनश्याम मगर यांनी २८ वर्षीय महिलेच्या ४.७५ किलो वजनाच्या शिशूची सामान्य प्रसूती यशस्वी केली. प्रसूतीनंतर माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंदोन-भिंदोन तांडा येथील रहिवासी दीपाली संजय राठोड या डॉ. मगर यांच्याकडे गरोदरपणात उपचारासाठी आल्या होत्या. तेव्हा गर्भातील शिशूचे वजन ४ किलोपेक्षा अधिक आहे, याचा अंदाज सोनोग्राफीत आला. गरोदरपणात आईच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास बाळाचे वजन वाढत जाते. अशावेळी प्रसूतीदरम्यान अडचणी येतात. बाळाचे खांदे आत अडकल्यास श्वास गुदमरून मृत्यूचाही धोका असतो. अशा बाळालाही पहिले ४८ तास निरीक्षणात ठेवणे गरजेचे असते. बाळाच्या रक्तातील साखर तपासणेही गरजेचे असते. 

डॉ. मगर म्हणाले, अशा अधिक वजनाच्या बाळाच्या जन्माचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी असते.  या आधीचे बाळांतपण नैसर्गिक असल्याने मातेला नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रोत्साहन दिले. तिचे मनोबल वाढविले. माता आणि तिच्या नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर नैसर्गिक प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. असे बाळंतपण हे आई आणि बाळासाठी अतिजोखमीचे असते; परंतु ही प्रसूती यशस्वी झाली आणि दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

साधारणपणे ३ किलोपर्यंत वजनसर्वसाधारणपणे अडीच ते तीन किलोपर्यंत शिशूचे वजन असते; परंतु मातेला मधुमेह असेल, तर शिशूचे वजन अधिक होत असते. अशावेळी सामान्य प्रसूती होणे अवघड असते, असे घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयpregnant womanगर्भवती महिला