शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सोसायट्यांकडे ४६ कोटी थकबाकी

By admin | Updated: June 21, 2017 23:43 IST

जिंतूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिंतूर शाखेद्वारे विविध सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. या ८२ सहकारी सोसायट्यांना कर्ज वाटप करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने ९१ कोटी रुपयांची रक्कम दिली होती.

ज्ञानेश्वर रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिंतूर शाखेद्वारे विविध सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. या ८२ सहकारी सोसायट्यांना कर्ज वाटप करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने ९१ कोटी रुपयांची रक्कम दिली होती. त्यापैकी ४५ कोटी रुपये बुडीत झाले असून यामधील ४६ कोटी रुपये सोसायटी सभासदाकडे थकबाकी आहे. सोसायट्यामुळे बँकेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या तालुक्यातील ८२ सहकारी सोसायट्या तोट्यात आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या जिंतूर शाखेमध्ये सेवा सहकारी सोसायट्याद्वारे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे गाव पातळीवर कर्ज वितरणाची जबाबदारी सोसायट्या पार पाडतात. यामध्ये जिल्हा बँकेच्या जिंतूर शाखेच्या तालुक्यामध्ये बारा शाखा आहेत. त्यापैकी ११ शाखांमध्ये शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. या शाखांच्या कार्यरत विविध सहकारी सेवा सोसायट्या महत्त्वाची भूमिका बजावतात. या सोसायट्यांना कर्ज स्वरुपात मध्यवर्ती बँकेने ९१ कोटी रुपये दिले आहेत. आज या सहकारी सोसायट्यांकडे केवळ ४६ कोटी रुपये सभासदांकडे बाकी असल्याने मध्यवर्ती बँकेला तब्बल ४५ कोटी रुपये तोटा सहन करावा लागणार आहे. या तोट्यात गेलेल्या सहकारी सोसायट्यांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या वैद्यनाथ समितीने ही मदत केली होती. तरीही या सहकारी सोसायट्या तोट्यात गेल्या आहेत, हे विशेष. तालुक्यातील ८२ सोसायट्यांकडे चालू थकबाकीदार १६ हजार ८४२ सभासद आहेत. तर या सोसायट्यांनी वाटप केलेली रक्कम ही ३९ कोटी ८१ लाख ६० हजार आहे. यामध्ये ५ हजार ३३ सभासदांकडे ६ कोटी २९ लाख ५६ हजार एवढी रक्कम बाकी आहे. तर जिंतूर मध्यवर्ती बँकेच्या विविध सेवा सोसायट्यांचे २२ हजार ८८५ एकूण सभासद संख्या आहे. या सोसायट्यांनी सभासदांना एकूण ४६ कोटी ३ लाख २६ हजार एवढी रक्कम कर्ज म्हणून वाटप केली आहे. या वर्षात खाते नवे-जुने करणाऱ्या १६ हजार ११६ सभासदांकडून ३६ कोटी ८५ लाख ८९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. तर या वर्षात १६२ सभासदांकडे १८ लाख २० हजार रुपयांचे कर्ज बाकी आहे. ६३४ सभासदांकडे १ कोटी ९५ लाख ८९ हजार रुपये रकक्म आहे. उर्वरित ४ हजार ८६१ सभासदांकडे ६ कोटी ३ लाख ३६ हजार रुपयांचे थकबाकी कर्ज आहे. अशाप्रकारे ९१ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जाच्या रकमेतील केवळ ४६ कोटी ३ लाख २६ हजार एवढीच रक्कम सध्या सेवा सहकारी सोसायट्यांकडे कर्ज आहे. तर बाकी ४५ कोटी रुपयांचा चुना सभासदांनी मध्यवर्ती बँकेला लावला आहे.