शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

३८० पैकी ४३ संस्था कार्यान्वित

By admin | Updated: September 15, 2015 00:31 IST

गंगाराम आढाव, जालना शासन एकीकडे शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करून त्यावर विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात.

गंगाराम आढाव, जालनाशासन एकीकडे शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करून त्यावर विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात. मात्र दुसरीकडे शासनाच्या योजनांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याने दुग्ध व्यवसायात आलेले शेतकरी यातून बाहेर पडत आहेत. जिल्ह्यात ३८० दूध सहकारी संस्थांची नोंदणी आहे. मात्र आज प्रत्यक्षात त्यापैकी फक्त ४३ दुध सहकारी संस्था जिल्ह्यात कार्यान्वीत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे.जालना जिल्ह्यात एकेकाळी दररोज १० ते १५ हजार लिटर दुधाचे संकलन होत असे, मात्र मागील तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी भीषण अशा दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यात ही वाढत्या महागाईमुळे पशुखाद्यांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना त्यांची दुभती जनावरे संभाळणे अवघड झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्री करून दुग्ध व्यवसायातून काढता पाय घेतला. त्याचा फटका जिल्ह्यात दुध व्यवसायावर बसला आहे.त्यामुळे १० हजार लिटर प्रतिदिन होणारे दुधाचे संकलन मागील तीन वर्षांपासून केवळ १० हजार लिटरच्या आत म्हणजे सहा ते सात हजार प्रतिलिटर दररोज प्रमाणे आहे.