लातूर : जिल्ह्यातील ९२ टक्के शाळेतील विद्यार्थ्यांचे बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत वैद्यकीय अधिक्षकांच्या ३० जणांच्या चमूकडून आरोग्य तपासणी करण्यात आली़ यामध्ये ७१ विद्यार्थ्यांना हृदय रोग असल्याचे निष्पन्न झाले़ त्यातील ४२ बालकांवर पुणे-मुंबई येथील रुग्णालयात राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली़ शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या सर्व बालकांची प्रकृती ठणठणीत आहे़ त्यामुळे राजीव गांधी जीवनदायी योजना ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार बनले आहे़ लातूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येतो़ या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील १९७७ शाळेतील ३ लाख ३६ हजार ४६५ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ८ हजार ६२५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ या तपासाअंती ३६ हजार २३६ विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आले़ यातील २५० विद्यार्थ्यांचे टुडीईको ची तपासणी करण्यात आली़ त्या तपासणीतून ७१ विद्यार्थ्यांना हृदयरोग असल्याचेही निदर्शनास आले़ यातील ४२ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली़ या बालकांना नवीन जीवन मिळाले आहे़ आज ही बालके अन्य बालकांसारखे दैनंदिन व्यवहार करीत आहेत़ राजीव गांधी जीवनदायीमुळे या बालकांना नवसंजिवनीच लाभली आहे़ (प्रतिनिधी)
४२ बालकांच्या हृदय रोगावर शस्त्रक्रिया
By admin | Updated: March 27, 2016 00:12 IST