शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

आगीत ४२ लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 12, 2014 00:06 IST

जालना- शहरातील औरंगाबाद मार्गावरील चंदनझिरा जवळ असलेल्या मारोती आॅटो मोटीव्ह शोरूमला लागलेल्या आगीत सुमारे ४२ लाखाचे नुकसान झाले.

 जालना- शहरातील औरंगाबाद मार्गावरील चंदनझिरा जवळ असलेल्या मारोती आॅटो मोटीव्ह शोरूमला लागलेल्या आगीत सुमारे ४२ लाखाचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नगर पालिका कर्मचारी चंद्रकात जैन हे औरंगाबादकडे जात असताना पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांना औरंगाबाद रोडवरील मारोती शोरूममधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे तसेच त्याचे शटर लाल झाल्याचे दिसले. ते पाहताच जैन यांनी ही माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना दिली. त्यानुसार माहिती मिळताच रविवारी पहाटे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. शटर लालबुंद झाल्याने खिडकीतून त्यांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. नंतर कंपनीचे मॅनेजर व अधिकारी आल्यानंतर पाठीमागील दरवाजा उघडून आग आटोक्यात आणली. दरम्यान, ही आग मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास लागली असल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला. तसेच एवढी मोठी आग लागलेली असतानाही व शोरूमवर खाजगी सुरक्षा रक्षक तैनात असतानाही अग्निशामक दलास लवकर पाचरण केले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्याने जाणारे पालिका कर्मचारी जैन यांनीच याबाबत माहिती दिली. ही माहिती वेळीच मिळाली नसती तर आग वरच्या मजल्यावर जाऊन मोठे नुकसान झाले असते. दरम्यान, या आगीत ३२ लाखांच्या पाच नवीन कार व शोरूम मधील कपाट, सोफासेट, फर्निचर आदी जळून १० लाखांचे असे एकूण ४२ लाखांचे नुकसान झाले असल्याचे मॅनेजर उपेद्र जपे यांनी सांगितले. ही आग आटोक्यात आण्यासाठी गणपत काटकर, राजन पाडपल्ली, आर. बी. सोनार, विश्वनाथ बनसोडे, सुरेंद्र ठाकूर, संदीप ससाने, चंद्रकात लोखंडे यांनी प्रयत्न केले. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात घटनेची नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या कोर्‍या ५ कार भस्म : जालना शहरात रविवारी एका शोरूमला लागलेल्या आगीत नव्या कोर्‍या ५ कार भस्म झाल्या. शो रुमच्या कार्यालयातील इतर सामानही जळून खाक झाले.