शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

४१ कृषीपंपाद्वारे होतोय धरणातून पाणी उपसा

By admin | Updated: August 11, 2014 00:03 IST

सुखापुरी : अंबड तालुक्याती सुखापुरी येथील तलावातून पंचनाम्यानंतरही कृषीपंपाद्वारे अवैध पाणी उपसा सुरुच असून भविष्यात पाऊस न झाल्याचे पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुखापुरी : अंबड तालुक्याती सुखापुरी येथील तलावातून पंचनाम्यानंतरही कृषीपंपाद्वारे अवैध पाणी उपसा सुरुच असून भविष्यात पाऊस न झाल्याचे पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सुखापुरीसह लखमापुरीच्या ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदारांकडे तलावातून अवैधरित्या शेतीसाठी पाणी उपसा केल्या जात असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. तेव्हा तहसीलदारांच्या सूचनेवरुन मंडळ अधिकारी ए. एस. लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील ए. बी. शिंदे, सुरेंद्र पोतदार, विजया राजपूत, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष इलियास बागवान, संतोष वखरे यांनी १ आॅगस्ट रोजी तलावातील तीनही बाजूस म्हणजे कुक्कडगाव शिवारात १० विद्युत पंप, लखमापुरी शिवारात १६ विद्युत पंप व कुक्कडगाव कौडगाव पश्चिस बाजूस १५ विद्युत पंपाचा रात्री ८ वाजेपर्यंत पंचनामा केला होता. मात्र आठवड्यानंतरही या अवैध पाणीउपसाधारकांवर कार्यवाही झालेली नाही. परिसरात केवळ सुखापुरी तलावातच २५ टक्के पाणीसाठा असल्याने भविष्यात ते पाणी टॅँकरद्वारे पिण्यासाठी पुरविण्याचे नियोजन होऊ शकते. तसेच जनावरांचाही प्रश्न सोडविल्या जाऊ शकतो. तलावातील पाणी उपशामुळे विहिरी व कुपनलिकांची पाणीपातळी कमालीची घटत चालली आहे. पाणी उपसा असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याची जटील समस्या निर्माण होणार असून त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून तलावातील पाणी उपसा थांबविण्यात यावा, अशी मागणी महेंद्र गायकवाड, सखाराम सातभद्रे, सुनिल राखुंडे, सुनील गाडे, बाळू अवधूत आदींनी केली आहे. मंडळ अधिकारी ए. एस. लोखंडे यांना पाणी उपशासंदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले की, १ आॅगस्ट रोजी विद्युत पंपाचा पंचानामा करुन तहसीलदारांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तसेच महावितरण व इरिगेशन विभागाला कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)