शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

४० गावांना तीव्र झळा...

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

मारूती कदम , उमरगा पावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

मारूती कदम , उमरगापावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एका गावात टँकर तर २० गावांसाठी ३० अधिग्रहणे करण्यात आली असून, ६० साठवण तलाव कोरडेठाक पडले आहेत़उमरगा तालुक्याची पावसाची सरासरी ९५० मिमी आहे़ गतवर्षी सरासरपीपैकी ८५० मि़मी़पाऊस झाला होता़ तर तालुक्यात कमी-अधिक ठिकाणी पाऊस झाल्याने काही ठिकाणचे तलाव भरले तर काही ठिकाणचे निम्म्यापर्यंतच भरले होते़ गत सहा वर्षे कमी अधिक प्रमाणात पावसाचे प्रमाण असेच राहिले आहे़ सद्यस्थितीत तालुक्यातील ६० साठवण तलाव कोरडेठाक पडले आहे़ बेनितुरा, कोळसूर, तुरोरी, जकापूर या तलावाही अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे़ उन्हाची तीव्रता कायम असली तरी पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे़ गत काही दिवसांपासून ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे़ उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यामुळे शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ तालुक्यातील चिंचोली (ज़), गुरूवाडी, चिंचकोटा, डिग्गी, कदेर, पळसगाव, बेंळंब तांडा, काटेवाडी, चिरेवाडी, बोरी, गुंजोटी, नारंगवाडी, केसरजवळगा, समुद्राळ, एकोंडी (ज़), मळगी, भगतवाडी आदी गावात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ चिंचोली (ज़) येथे गत दोन महिन्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ तर २० गावांसाठी ३० ठिकाणी विहिरी, कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेले ३० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत़ एकूणच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत आणि पावसाने पाठ फिरविल्याने पाणीटंचाई उग्र रूप धारण करीत आहे़ ८९ लाखांचा कृती आराखडातालुक्यात निर्माण झालेल्या व संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ८८ लाख, ९२ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला आहे़ सदरील आराखडा मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे़ वन्य प्राणी गावकुसालापावसाने ओढ दिल्याने साठवण तलाव, विहिरी, शेततळी आदी ठिकाणचे पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत़ वनक्षेत्रातही पिण्याचा पाण्याचा अभाव असल्याने वानर, ससे, मोर, कोल्हे, तरस आदी वन्य प्राणी गावाच्या शिवारातील जलस्त्रोतांवर तहान भागविण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे़ वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे़