शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कनेरगाव नाका येथे ४० किलो गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:13 IST

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे कारसह ४० किलो गांजा व दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली/ कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे कारसह ४० किलो गांजा व दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली.कनेरगाव नाका येथून कारमध्ये गांजा नेला जात असल्याची माहिती चौकीतील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कनेरगाव चौकीचे पोहेकॉ सुनील खिल्लारे, श्याम खुळे, मोहन धाबे, पंडित तारे यांनी अकोला - नांदेड महामार्गावर वाहनाची तपासणी केली. तेव्हा कार क्र. एमएच 0२-केए-३६६५ मधून गांजा नेला जात असल्याचे आढळून आले. तर कारचालकाकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून संशय बळावल्याने डिकी उघडून पाहिली. तेव्हा तब्बल ४० किलो गांजा आढळून आला. या कारमध्ये दोघे होते. रियाजोद्दीन गैसोद्दिन सय्यद (३५) रा.अकोट, जि.अकोला व मो. राजिक मो.अकिल मन्सुरी (३१) रा.वलगाव रोड, अमरावती हे दोघे या कारमध्ये होते. कारसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या आरोपींना गोरेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांची सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच होणार असल्याचे खुळे यांनी सांगितले.