सेनगाव : लिलावात निघालेल्या ब्रम्हवाडी रेती घाटावरून विनापावती अवैध वाळू वाहतूक करणारे चार वाहने सेनगाव तहसील कार्यालयाच्या पथकाने २७ मार्च रोजी सुट्टीच्या दिवशी कारवाई करीत पकडली. या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यात पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात राजरोस वाळू चोरी होत आहे. वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी सेनगाव तहसील कार्यालयाचे पथक कारवाई करीत दंड वसूल करीत असले तरी वाळूचोरीच्या प्रमाणात कारवाई तोकडी पडत आहे. त्यामुळे वाळू चोरीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्याशिवाय लिलावात निघालेल्या ब्रम्हणवाडी रेती घाटावरून विनापावती वाळू वाहतूक होत असल्याचा प्रकार रविवारी सेनगाव तहसील कार्यालयाच्या पथकाच्या निदर्शनास आला. सलग सुट्ट्यामध्ये होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम कासार, तहसीलदार आर.के. मेंडके यांच्या सुचनेवरून रविवारी सकाळी सेनगाव तहसील पथकाने ब्रम्हवाडी शिवारात कारवाई करीत पावती विना वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर व दोन ट्रॅक्टर पकडले असून दंड वसूल करण्यासाठी सदर वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली आहे. सदर कारवाई मंडळ अधिकारी जी. जी. धुळे, एन. डी. नाईक, डी. बी. दहे, तलाठी एस. यु. लोंढे, एस. बी. थोरात, एम. एन. लोणकर, चालक वाघमारे आदींच्या पथकाने केली आहे. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)
वाळू वाहतूक करताना ४ वाहने पकडली
By admin | Updated: March 27, 2016 23:48 IST