शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४ हजार ईव्हीएमचा कोटा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:23 IST

लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे

ठळक मुद्देनिवडणुकांची लगबग : जुलैपासून सुरू होणार वेगाने तयारी; निवडणूक आयोगाने घेतला मशीनचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेत होवोत अथवा तत्पूर्वी होवोत, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रिक व्होटिंग मशिन्स मागणीचा आढावा घेतला असून, जिल्ह्यासाठी ४ हजार नवीन मशिन्सचा कोटा निश्चित झाल्याचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला आयोगाने पाठविले आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबरपर्यंत मशिन्सची जमवाजमव करण्याची तयारी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.राज्याला २ लाख २५ हजार ईव्हीएम मिळतील. गरजेपेक्षा १७५ पट मशिन्सची मागणी करण्यात आली होती. २,५७७ मतदान केंद्रांची नोंद सध्या जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यानुसार बॅलेट व कंट्रोल युनिटच्या मागणीनुसार ४ हजारांच्या आसपास युनिट मिळतील.मार्च अखेरपर्यंत २६ लाख ५० हजार ३७९ एकूण मतदार जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये १४ लाख ६ हजार ८२३ पुरुष आणि १२ लाख ४३ हजार ५३८ महिला मतदारांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. चार वर्षांत जिल्ह्यामध्ये ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत.३५० हून अधिक मतदान केंद्रे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वाढण्याची शक्यता सध्या आहे. जानेवारीअखेरीस मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात आला असला तरी नोंदणी नियमितपणे सुरू आहे.जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पूर्व, पश्चिम, मध्य हे मतदारसंघ येतात. पैठण, फुलंब्री, सिल्लोड हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघाच्या रचनेत काहीही बदल होणारनाही.मतदारसंघ मागच्या वेळी ज्या भौगोलिक सीमेत होता, तेवढाच यावेळीदेखील राहील. विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रसंख्या ही वाढलेल्या मतदार संख्येमुळे वाढणार आहे.३ लाख ३६ हजार मतदार वाढलेजिल्ह्यात २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत चार वर्षांत ३ लाख ३६ हजार २१७ मतदार वाढले आहेत. ८५ हजार नवमतदारांची भर दरवर्षी पडली आहे. यापुढे होणाºया नोंदणी कार्यक्रमात सुमारे १ लाख मतदार नव्याने नोंदणी होण्याची शक्यता आहे. मतदार नोंदणी वर्षभर सुरूच राहणार आहे.२३ लाख १४ हजार ९७ मतदार होते२०१४ साली २३ लाख १४ हजार ९७ मतदार होते. त्यासाली लोकसभा निवडणुकीसाठी २४ एप्रिल रोजी मतदान, तर १६ मे २०१४ रोजी मतमोजणी झाली होती.डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. निर्धारित वेळेत निवडणुका होतील, कारण निवडणूक आयोगाकडून अद्याप त्याअनुषंगाने काहीही सूचना आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद