शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

शहरात ४ हजार सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:27 IST

शहराच्या कानाकोप-यात आणि चौकाचौकांत लवकरच चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यासाठी स्मार्ट सिटीमधून १०० कोटी आणि राज्य सरकारच्या ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत २३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराच्या कानाकोप-यात आणि चौकाचौकांत लवकरच चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यासाठी स्मार्ट सिटीमधून १०० कोटी आणि राज्य सरकारच्या ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत २३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन तीन महिन्यांत कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकारांना दिली.आयुक्त म्हणाले की, शहरात यापूर्वी २ कोटी रुपये खर्च करून ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. आता आम्ही स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराला देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर करण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट सिटीतून मिळालेल्या निधीतून चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कॅमे-यांच्या निगराणीसाठी दोन नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत. यातील एक कक्ष पोलीस आयुक्तालयात तर दुसरा महानगरपालिकेत असेल.या प्रकल्पांतर्गत तीन प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी चेहरा ओळखणारे काही कॅमेरे प्रमुख रस्त्यांवरील चौकात असतील. तर दुसरे एनपीआर प्रकारचे कॅमेरे आहेत. आॅटोमॅटिक नंबर प्लेट रेकनायझिंग कॅमे-यांमुळे वाहतूक नियम मोडून पळणा-यांवर कारवाई क रणे पोलिसांना सोपे जाईल. संबंधित वाहनाच्या नंबरच्या आधारे त्या वाहनचालकांना घरपोच दंडाच्या नोटिसा पाठवून कारवाई केली जाईल. ‘ पॅन ट्रेड झूम’(पीटीझेड) आणि फिक्स कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. पीटीझेड कॅमेरे हे शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक चौकात हे कॅ मेरे असतील. ३६० अंशेंमध्ये ते फिरत असतात आणि चौकातील प्रत्येक हालचालींवर या कॅमेºयांची नजर असते. एवढेच नव्हे तर हे कॅमेरे आॅटोमॅटिक पद्धतीने झूम होतात, त्यामुळे रस्त्यांवरील व्यक्तीचा चेहरा आणि त्याच्या वाहनांचा अचूक क्रमांक ते टिपतात. फिक्स झूम कॅमेरेही पोलिसांना लाभदायक ठरणार आहेत.