शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

३६९ ग्रा.पं.नाच कामगिरीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:44 IST

जिल्ह्यातील ५६३ पैकी ३६९ ग्रामपंचायतीच परफॉर्मंस ग्रँटसाठी पात्र ठरल्या आहेत. लेखापरीक्षण व उत्पन्नवाढीच्या निकषात पात्र न ठरल्याने इतर ग्रा.पं.ना या निधीपासून वंचित राहावे लागले आहे. यात गतवर्षीसाठी यंदा ४.१७ कोटी रुपये वितरित केले आहेत. यंदा पुन्हा या योजनेत सहभागासाठी शासन निर्णय झाल्याने संधी प्राप्त होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ५६३ पैकी ३६९ ग्रामपंचायतीच परफॉर्मंस ग्रँटसाठी पात्र ठरल्या आहेत. लेखापरीक्षण व उत्पन्नवाढीच्या निकषात पात्र न ठरल्याने इतर ग्रा.पं.ना या निधीपासून वंचित राहावे लागले आहे. यात गतवर्षीसाठी यंदा ४.१७ कोटी रुपये वितरित केले आहेत. यंदा पुन्हा या योजनेत सहभागासाठी शासन निर्णय झाल्याने संधी प्राप्त होणार आहे.अनेक ग्रामपंचायतींनी वर्षानुवर्षे आपण केलेल्या कामाचेच लेखापरिक्षण केलेले नाही. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींना परफॉर्मंस ग्रँट देणे शक्य नव्हते. गतवर्षी ४.१७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर सर्वच ग्रामपंचायतींना यात संधी मिळावी, यासाठी प्रशासनाने मार्चनंतरही संधी दिली होती. त्यामुळे हा निधी ग्रामपंचायतींना वितरित होण्यासाठी आॅगस्टपर्यंतची वाट पहावी लागली होती. यानंतर लेखापरिक्षण व उत्पन्नवाढीसह प्रस्ताव दाखल न करणाºया ग्रा.पं.ला वगळण्यात आले. उर्वरित ग्रा.पं.ला लोकसंख्येसाठी ९0 टक्के तर क्षेत्रफळासाठी १0 टक्के याप्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे वित्त आयोगाचा आधी निधी मिळालेला असतानाही हा नवा निधी मिळालेल्या ग्रा.पं.चा फायदा झाला. त्यांना यातही काही कामे करणे शक्य होणार आहे. मोठ्या ग्रा.पं.ना तर घसघशीत निधी मिळाला. यात हिंगोलीत ५९ ग्रा.पं.ला ७४.७८ लाख, वसमतला ७८ ग्रा.पं.साठी १.११ कोटी, कळमनुरीत ९६ ग्रा.पं.साठी १.२0 कोटी, सेनगावात ८७ ग्रा.पं.साठी १.१८ कोटी तर औंढ्यातील ३९ ग्रा.पं.साठी ५३.५0 लाख वितरित झाले.