शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत ३४ बॅलेट युनिट, २२ कंट्रोल युनिट, २५ व्हीव्हीपॅट पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 14:41 IST

ही मतदान यंत्रे वेळेत सुरू झाली असती तर मतदानाचा टक्का निश्चित वाढला असता. 

औरंगाबाद : मतदान प्रक्रिया सुरू करताना आणि सुरू झाल्यानंतर सुमारे ३४ बॅलेट युनिट, २२ कंट्रोल युनिट आणि २५ व्हीव्हीपॅट बंद पडले. यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब झाला. ही मतदान यंत्रे वेळेत सुरू झाली असती तर मतदानाचा टक्का निश्चित वाढला असता. 

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले की, मॉकपोलदरम्यान सकाळी २४ बॅलेट युनिट बंद पडले. १७ कंट्रोल युनिट आणि १८ व्हीव्हीपॅट सुरूच झाले नाहीत. १० बॅलेट युनिट आणि ५ कंट्रोल युनिट आणि ७ व्हीव्हीपॅट मतदान सुरू असताना बंद पडले. ०.७५ टक्के यंत्र मॉकपोलदरम्यान बंद पडले, तर ०.३० टक्के ईव्हीएम मतदान सुरू असताना बंद पडले. काही ठिकाणी व्हीव्हीपॅट हळू सुरू होत असल्याच्या तक्रारीही आल्या. १५ सेकंद व्हीव्हीपॅटसाठी गेले. १ हजार मतांसाठी १५ हजार सेकंदांचा वेळ जाणार असल्याचे गृहीत धरून आयोगाने १ तास मतदानाची वेळ वाढविली. शहरात जवळपास ९० बुथवर अतिरिक्त मनुष्यबळदेखील वाढवून देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

गंगापूर तालुक्यातील एका गावाचा बहिष्कार कायम

गंगापूर तालुक्यातील शहीदपूरवाडी या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार कायम आहे. सदरील गाव वैजापूर मतदारसंघात आहे. रस्त्याचे काम मागील पाच वर्षांत रखडल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी, नायब तहसीलदारांनी ग्रामस्थांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामुळे काहीही फरक पडला नाही.

शारदा मंदिरमध्ये ‘ईव्हीएम’ यंत्र पडले बंदऔरंगपुरा येथील शारदा मंदिर क न्या प्रशालेत सकाळी ‘ईव्हीएम’ यंत्र बंद पडल्यामुळे तासभर मतदान प्रक्रिया खोळंबली. मतदान केंद्रावरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तातडीने जिल्हा निवडणूक विभागाशी संपर्क साधून दुसऱ्या ‘ईव्हीएम’ यंत्रावर मतदान प्रक्रिया सुरू केली. या मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह फारसा दिसून आला नाही. सकाळी थोडी रांग दिसून आली; पण दुपारी १२ वाजेनंतर मात्र हे मतदान केंद्र ओस पडलेले होते. २६४ क्रमांकाच्या या केंद्रावर ६७७ मतदारांची मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

कडा कार्यालयात मतदानाला उशीरकडा कार्यालयातील मतदान केंद्र २१९ आणि २२२ वर सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाला होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सकाळी ७ वाजता मतदान सुरु होऊ शकले नाही. केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.  एका तासानंतर या दोन्ही केंद्रावरील यंत्रांतील बिघाड दुरुस्त झाला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019