शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

स्वच्छता अभियानात मनपाने उचलला ३२२ टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:22 IST

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला.

ठळक मुद्दे४९ ठिकाणी सफाई : २३५९ जणांचा सहभाग, सकाळी ६ ते १२ पर्यंत अभियान

औरंगाबाद : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला. या अभियानात महापालिकेचे १२२० कर्मचारी, विविध सेवाभावी संस्था, बचत गटांचे १११९ प्रतिनिधी उपस्थित होते.महापौर नंदकुमार घोडेले व आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून ‘आओ शहर सुंदर बनाये’ हा उपक्रम राबविला जात आहे. शनिवारी अभियानातील पहिल्या टप्प्यात तब्बल ३२२ टन कचरा गोळा करून तो कचरा प्रक्रिया केंद्रावर पोहोचविण्यात आला. शहरातील नऊ प्रभागांत अभियान राबविण्यात आले. सकाळी ६ वाजता जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा येथे महापौरांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आयुक्त डॉ. निपुण विनायक, नगरसेवक राजू शिंदे, गोकुळसिंग मलके, नगरसेविका सुरेखा सानप, जयश्री कुलकर्णी, कीर्ती शिंदे, अर्चना नीळकंठ, ज्योती मोरे, सायली जमादार, शोभा बुरांडे, अतिरिक्त आयुक्त मंजूषा मुथा, संतोष कवडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, स्मार्टसिटीच्या अंजू उप्पल, प्रशांत नरवडे, सहायक आयुक्त, विभागप्रमुख, वॉर्ड अधिकारी, जवान, सफाई कामगार, ७० ते ८० महिला बचत गट कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी, महापालिका शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.मोहिमेचे ठिकाणबीबीका मकबरा परिसरातील मोकळी जागा, बसस्थानक, रहेमानिया कॉलनी येथील उद्यान व वाचनालय, चिकलठाणा विमानतळ परिसर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर परिसर, एमआयटी महाविद्यालय ते महानुभाव आश्रम रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्याचा परिसर, रेल्वेस्टेशन उड्डाणपूल, रेल्वेस्टेशनलगत असलेल्या मोकळ्या जागा स्वच्छ करण्यात आल्या.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान