जालना : ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी शासनाने ‘एफडीआर’ योजनेअंतर्गत ३१ कामांसाठी ६ कोटी ६३ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला दिला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात मागील दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने काही रस्ते व पूल खराब झाले होते. त्याचा परिणाम परिसरातील गावांच्या दळणवळणावर झाला होता. विशेष म्हणजे काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत होती. रस्ते व पुलांच्या नादुरूस्तीमुळे एस.टी.च्या बसगाड्याही गावापासून दूर अंतरावरच थांबत होत्या. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने याबाबत काही रस्ते व पुलांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार ३१ कामांच्या दुरूस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे. या कामांमध्ये नळडोह ते पेवा, जोडरस्ता मंगरूळ, जोडरस्ता रानमळा, जोडरस्ता अंवलगाव, जोडरस्ता देवठाणा, जोडरस्ता देवठाणा, हेलसवाडी ते लिंबेवडगाव, लिंबेवडगाव ते झोपडपट्टी, केंधळी जोडरस्ता, जोडरस्ता मेसखेडा (ता. मंठा), जोडरस्ता कोरेगाव, जोडरस्ता रोहिना, लोणी ते गोळेगाव संकनपुरी ते चांगतपुरी, पळशी ते आनंदगाव, अकोली ते ब्राह्मणवाडी, कोकाटे हदगाव ते चंदूनाईक तांडा, पळशी ते फुलवाडी, श्रेष्टी ते वाहेगाव, नांद्रा ते आंबा (ता. परतूर), चिंचोली ते देऊळगाव तांडा, जोडरस्ता बामखेडा (ता. भोकरदन), बेलोरा धोंडखेडा ते चिंचखेडा, जोडरस्ता मंगरूळ (ता. जाफराबाद), जोडरस्ता मंगरूळ (ता. जाफराबाद), जोडरस्ता राममूर्ती (ता. जालना), जोडरस्ता अहंकार देऊळगाव (ता. जालना) यांचा समावेश आहे. सन २०१३-१४ मधील १३ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत पाच कामांसाठी १ कोटी ६३ लाखांचा निधी प्राप्त झाला. यामध्ये लोणी ते गोळेगाव जोडरस्ता, लोणी ते पळशी (ता. परतूर), सुखापुरी ते घुंगर्डे हदगाव (ता. अंबड), फत्तेपुर (ता. भोकरदन) आणि वरूडी जोडरस्ता (ता. बदनापूर) या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी जि.प. कडे मागणी केली होती. (प्रतिनिधी)याबाबत जि.प.चे उपाध्यक्ष राहुल लोणीकर म्हणाले की, दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून हा निधी प्राप्त झाला आहे. आणखी काही रस्ते व पुलांच्या दुरूस्तीकरीता शासनाकडे प्रस्ताव पाठविले असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले.
३१ रस्ते, पुलांचे भाग्य उजळले
By admin | Updated: July 18, 2014 01:50 IST