शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४१० दिवसांत ३,००५ कोरोना बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ५३० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ५८९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर ...

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ५३० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ५८९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २४ आणि अन्य जिल्ह्यांतील सात रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या ४१० दिवसांत कोरोनाने ३,००५ रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या सहा हजार २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात ५ एप्रिल २०२० रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. त्यानंतर दररोज मृत्यूसत्र चालले. काही काळ मृत्यूचक्र थांबले. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक वाढले. जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत एकूण एक हजार २६८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकूण मृत्यूची ही संख्या गुरुवारी ३,००५ झाली. गेल्या ८१ दिवसांत एक हजार ७३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३९ हजार १४३ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २९ हजार ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील ५३० नव्या रुग्णांत शहरातील १९०, तर ग्रामीण भागामधील ३४० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ११७ आणि ग्रामीण भागातील ४७२ अशा ५८९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वाळूज येथील ४६ वर्षीय पुरुष, औरंगपुरा येथील ३२ वर्षीय पुरुष, जैतापूर, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ७० वर्षीय पुरुष, आवडे उंचेगाव, पैठण येथील ८२ वर्षीय महिला, पिंपरी, सिल्लोड येथील ६० वर्षीय पुरुष, नंदनवन काॅलनीतील ६१ वर्षीय महिला, बिडकीन येथील ७० वर्षीय महिला, शहरातील ५० वर्षीय महिला, गेवराई, पैठण येथील ७९ वर्षीय महिला, पैठण येथील ५५ वर्षीय महिला, एन-७ येथील ३४ वर्षीय पुरुष, शांडनेरवाडी, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, छावणीतील ५५ वर्षीय महिला, बोरुडी, वैजापूर येथील ६१ वर्षीय महिला, दमानी खुर्द, कन्नड येथील ४८ वर्षीय महिला, वाकी कदीम, कन्नड येथील ३० वर्षीय महिला, टाकळी अंबड, पैठण येथील ५९ वर्षीय पुरुष, बाजारसावंगी, खुलताबाद येथील ३५ वर्षीय महिला, शांतीपुरा, लासूर स्टेशन येथील ६६ वर्षीय महिला, चौराहा येथील ७० वर्षीय पुरुष, देवळाई रोड, साईनगर येथील ७४ वर्षीय पुरुष, एन-९ येथील ६८ वर्षीय पुरुष, प्रतापनगर येथील ६६ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ३, सातारा परिसर १, शिवाजीनगर ३, बीड बायपास ८, गारखेडा परिसर ५, नारेगाव २, शहागंज २, अजबनगर १, न्यू नंदनवन कॉलनी १, बन्सीलालनगर १, चिकलठाणा ३, मिलेनिअर पार्क, एमआयडीसी २, एन-२ येथे ४, जयभवानीनगर २, हनुमाननगर १, परिजातनगर ३, जाधववाडी १, लक्ष्मी कॉलनी १, रामनगर ३, हर्सूल ३, संजयनगर १, राजनगर २, न्यायनगर १, एन-४ येथे १, पुंडलिकनगर २, भारतमाता कॉलनी १, जवाहर कॉलनी २, शास्त्रीनगर १, नंदनवन कॉलनी १, विशालनगर १, नवनाथनगर १, प्रसन्नदत्त पार्क १, आलोकनगर २, भावसिंगपुरा १, पेठेनगर २, होळकर चौक १, एन-६ येथे २, बजरंग चौक १, सनी सेंटर १, एन-८ येथे १, एन-७ येथे २, एन-९ येथे ४, सुरेवाडी ४, म्हसोबानगर १, मयूर पार्क ८, एन-३ येथे २, वानखेडेनगर १, जयसिंगपुरा १, एन-१२ येथे १, घाटी परिसर १, कैलाशनगर १, बेगमपुरा १, खोकडपुरा १, बंजारा कॉलनी १, कांचनवाडी ३, द्वारकानगर २, गजानन मंदिर परिसर १, पडेगाव २, प्रतापनगर १, होनाजीनगर १, अब्दुलशहानगर १, विश्राम कॉलनी १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, घाटी ३, अन्य ६९.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १०, वडगाव कोल्हाटी ६, सिडको वाळूज महानगर २, वाळूज २, बोकनगाव १, पिसादेवी १, गोळेगाव, ता. खुलताबाद १, गेवराई १, भारेगाव १, वाळूज मोहटादेवी मंदिर १, बोरगाव, ता. गंगापूर १, कन्नड १, शेलगाव, ता. कन्नड १, अंधारी, ता. सिल्लोड १, वाघाडी, ता. पैठण १, शेंद्रा १, तांडा बालानगर १, पैठण २, वळदगाव १, जिकठाण, ता. गंगापूर १, ममतापूर, ता. गंगापूर १, दौलताबाद १, पिशोर, ता. कन्नड १, सिल्लोड १, खासगाव १, वागदी ता. पैठण १, अन्य २९७.