शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

३० % नागरिक पाण्यासाठी टँकरवर

By admin | Updated: April 15, 2016 01:51 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे़ जिल्ह्यातील ४९३ गावे आणि १५ वाड्यात पाण्याचे स्रोत आटले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे़ जिल्ह्यातील ४९३ गावे आणि १५ वाड्यात पाण्याचे स्रोत आटले आहेत. तेथील साडेनऊ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून ६४९ टँकरद्वारे १३३९ खेपांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चार वर्षांपासून पुरेसा पाऊस झालेला नाही़ त्यामुळे लघु, मध्यम प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडेठाक झालेले आहेत. काही प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणी आहे़ विहीर, बोअर हे पाण्याचे स्रोतही आटत आहेत़ जायकवाडीच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सध्या गंगापूर तालुक्यात असून, आकडा १६६ आहे़ त्यापाठोपाठ पैठणमध्ये १५८, वैजापूरमध्ये १५६ टँकर सुरू आहेत़ सर्वात कमी टँकर सोयगाव तालुक्यात असून, संख्या केवळ २ आहे़ जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सोयगाव वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये दिवसागणिक टँकरच्या संख्येत वाढ होत आहे़ अनेक ठिकाणी टँकर भरण्यासाठी प्रशासनाला ५० ते ७० किलोमीटरपर्यंतचा फेरा मारावा लागत आहे़ ज्याठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा सपाटा प्रशासनाकडून सुरू आहे़ सद्य:स्थितीत ४३४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे़ यातील २४१ विहिरींवरून टँकरमध्ये पाणी भरण्यात येत आहे़ तर उर्वरित १९३ विहिरींवरून नागरिकांना थेट पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे़ टंचाईची तीव्रता अधिक असल्याने विहीर अधिग्रहणाच्या संख्येतही वाढ होत आहे़