शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार नागरिकांचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:07 IST

औरंगाबाद : हर्सूल गावाला उद्या रविवारपासून जायकवाडीचे पाणी देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हर्सूल गावाला उद्या रविवारपासून जायकवाडीचे पाणी देण्यात येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता नागरिकांना पाणी देण्यात येणार आहे. या भागात पाणीपुरवठ्याचे टप्पे करून दररोज पाच लाख लिटर पाणी देण्यात येईल.हर्सूल गावाचा समावेश तीन दशकांपूर्वी मनपा हद्दीत झाला. गावातील नागरिकांना जायकवाडीच्या पाण्याची चवच माहीत नव्हती. वर्षानुवर्षे नागरिक हर्सूल-सावंगी येथील विहिरीच्या पाण्यावर तहान भागवत होते. मागील दोन वर्षांपासून विहिरीतील पाणी कमी झाल्याने तब्बल ३० हजार नागरिकांची तहान कशी भागवावी असा प्रश्न भेडसावत होता. शहराप्रमाणे हर्सूल गावालाही जायकवाडीचे पाणी द्यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाणी प्रश्नात लक्ष घालून तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना हर्सूल कारागृहाजवळील पाण्याच्या टाकीतून पाणी द्यावे, अशी सूचना केली. हर्सूल कारागृहाजवळ मनपाने २० वर्षांपूर्वी मोठा जलकुंभ बांधला आहे. कारागृहापासून हर्सूल गावापर्यंत मोठी जलवाहिनी टाकण्यासाठी नगरसेवक पूनम बमणे यांनी पाठपुरावा केला. ६ लाख रुपये खर्च करून मनपाने स्वतंत्र जलवाहिनीही टाकली. मात्र, पाण्याची जोडणी करण्यात आली नव्हती. दोन दिवसांपूर्वीच मनपाने पाण्याची जोडणीही केली. हर्सूल गावात चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होतोय किंवा नाही, याची शहानिशा करण्यात आली. उद्या उद्घाटन करण्यात येणार असल्याचे नगरसेवक बमणे यांनी नमूद केले.