शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

‘विप्रो’चे साफल्य फर्निचर युनिट बंद झाल्याने २५० कामगार बेकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:29 IST

दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देकामगारांचा दोन दिवसांपासून कंपनीसमोर ठिय्या कामगार व व्यवस्थापनात वाद सुरू आहेत

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : कामगार व व्यवस्थापनात सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे वाळूज एमआयडीसीतील विप्रो कंपनीचे साफल्य इंडस्ट्रीजमार्फत सुरू असलेले फर्निचर युनिट बुधवारी व्यवस्थापनाने बंद केले. या निर्णयामुळे कंपनीत काम करणाऱ्या २५० कामगारांचा रोजगार हिरावला गेला असून, दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

वाळूज एमआयडीसीतील विप्रो इंटरप्रायजेस प्रा.लि.मार्फत ७ ते ८ वर्षांपूर्वी साफल्य इंडस्ट्रीज हे युनिट सुरू केले. या युनिटमध्ये विविध प्रकाराचे फर्निचर तयार करण्यात येते. कंपनीत २५० कामगार काम करतात. काही दिवसांपूर्वी या कंपनीतील १६१ पुरुष व ६९ महिला कामगारांनी महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे सभासदत्व स्वीकारले होते.

यावरून कामगार व व्यवस्थापनात वाद सुरू झाला. त्यातच आठवडाभरापूर्वी कंपनीतून रॉ-मटेरियल बाहेर पाठविण्यावरून पुन्हा वाद उफाळून आला. व्यवस्थापक सुमित बंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ करून महिला कामगारांना मारहाण केल्याचा आरोप करीत कामगारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी व्यवस्थापक बंड यांच्या तक्रारीवरून कामगारांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यवस्थापन व कामगारांतील संघर्षामुळे व्यवस्थापनाने ३० डिसेंबरपासून उत्पादन थांबविले होते. मात्र, कंपनीतील सर्व कामगार शिफ्टप्रमाणे दररोज कंपनीत कामावर येत होते. व्यवस्थापनाने बुधवारी कामगारांना कंपनीत प्रवेश करण्यास मज्जाव करीत टाळे लावले. त्यामुळे संतप्त कामगारांनी दोन दिवसांपासून कंपनीतच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कंपनी पूर्ववत सुरू करून कामगारांना रोजगार देण्यात यावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे संस्थापक सचिव रामकिसन पा. शेळके, उपाध्यक्ष गणेश घोरपडे, शिवशंकर सगट यांनी सांगितले. 

याविषयी साफल्य इंडस्ट्रीजचे भास्कर जाधव म्हणाले की, गतवर्षी मार्चपासून कामगार असहकार्य आंदोलन करून कंपनीतील अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून, कामगारांमुळे अधिकाऱ्यांच्या जीवितास धोका असल्यामुळे युनिट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कामगार आयुक्त कार्यालयात बैठकवादावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी कामगार उपायुक्त कार्यालयात व्यवस्थापन व महाराष्ट्र कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, व्यवस्थापनाने बैठक पुढे ढकलण्याची विनंती केल्याने सोमवारी कामगार उपायुक्त कार्यालयात बैठक होणार असल्याचे सहायक कामगार उपायुक्त शर्वरी पोटे यांनी सांगितले.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीEmployeeकर्मचारीStrikeसंप