औरंगाबाद : शहरातील ६ प्रभागांमध्ये २५० कोटी रुपये मालमत्ताकर थकीत असल्याचा धक्कादायक अहवाल करसंकलक विभागाने तयार केल्याची माहिती पुढे आली आहे. यातील १०० कोटी चालू वर्षातील करवसुलीचे उद्दिष्टच आहे. उर्वरित १५० कोटी रुपये थकीत असल्याचे अहवालातील आकडेवारीवरून दिसते. मनपाच्या आर्थिक परिस्थितीमुळे विकासकामे होत नाहीत. शासनाकडून निधी मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. मनपाचे उत्पन्न घटलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये मालमत्ताकर वसुली करण्यासाठी पालिका पाहिजे तसे नियोजन करताना दिसत नाही. शहरातील मालमत्तांच्या आकड्यांमध्ये भर पडली आहे. २ लाख १ हजार ८०७ मालमत्ता सध्या शहरात असल्याचे करसंकलन विभागाच्या अहवालावरून दिसते आहे. १ लाखांहून अधिक कर थकीत असलेल्या, ५० हजारांपर्यंत कर थकलेल्या, १० हजार रुपयांपर्यंत कर थकलेल्या मालमत्तांचे वर्गीकरण करण्यात आले असून पालिकेने आजवर त्या मालमत्तांकडून करसंकलन केल्याचे दिसत नाही. अंदाजे साडेतीन हजार मालमत्तांकडे १ लाख रुपयांहून अधिक मालमत्ताकर थकीत आहे. ही सगळी थकबाकी बड्या मालमत्ताधारकांकडे आहे. सुमारे ११० कोटी रुपयांचा कर बड्या मालमत्तांकडे थकलेला आहे.
२५० कोटींचा कर थकला
By admin | Updated: December 26, 2014 00:16 IST