शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज परिसरात ५ महिन्यांत २५ जणांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:57 IST

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या मोठी 

ठळक मुद्देमहिन्याला सरासरी ५ आत्महत्यामानसिक ताणातून टोकाचे पाऊल

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज महानगर परिसरात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण, आजारपण आदी कारणांच्या ताणतणावातून चालू वर्षातील गत पाच महिन्यांत तब्बल २५ जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक बाब पोलीस ठाण्यातील नोंदीवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे यात २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने आत्महत्येचा विषय चिंतेचा बनला आहे. 

औद्योगिक क्षेत्रामुळे बहुभाषक व बहुसांस्कृतिक ओळख निर्माण झालेल्या वाळूज महानगरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. याबरोबरच आता आत्महत्येचे प्रकार वाढल्याचे पोलीस दप्तरीच्या नोंदी दर्शवीत आहेत. या भागात बहुतांशी कामगार वर्ग वास्तव्यास आहे. कामानिमित्त घरदार सोडून आलेल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आर्थिक चणचणीमुळे कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता वाढते. शिवाय सहनशीलताही घटते. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण, आजारपण, दारू, भीती, पे्रमभंग आदी कारणांच्या मानसिक ताणतणावातून अल्पवयीन शाळकरी मुलांबरोबरच तरुण-तरुणी व महिला-पुरुष आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. 

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, जोगेश्वरी, रांजणगाव, साजापूर, विटावा, कमळापूर आदी भागांतील २५ जणांनी गळफास व विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली आहे. यात दोन अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.विशेष म्हणजे या आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींचे आहे. मानसिक तणाव हे आत्महत्येमागचे मूळ कारण असल्याचे तज्ज्ञ व्यक्तींकडून सांगितले जाते. मानसिकदृष्ट्या खचलेल्या मनामुळे आत्महत्येचे सारखे विचार सतत येत असल्याने, अशा व्यक्तींची वेळीच दखल घेतली गेली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आजच्या युवा पिढीत सहनशीलतेचा अभाव आहे. 

महिन्याला सरासरी ५ आत्महत्याचालू वर्षात पहिल्या ५ महिन्यांतच १६ पुरुष व ९ महिला, अशा एकूण तब्बल २५ जणांनी आत्महत्या केली. यात दोन अल्पवयीन असून, तब्बल १४ जण २० ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत. उर्वरित ३१ ते ४५ या वयोगटातील आहेत. मानसिक तणावातून दर महिन्याला सरासरी ५ जण आत्महत्या करून आपले जीवन संपवीत आहेत. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना तणावमुक्त ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक पातळीवर चर्चासत्र, व्याख्याने आयोजित करून तरुण वर्गाला मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे. 

यांनी केली आत्महत्याआत्महत्या करणाऱ्यांत स्वप्नील काटकर, युवराज जगदाळे, गुंजन निशाद, रघुनाथ गाजरे, मीना जोगदंड, गणेश खुने, संजय पाटील, सुरेश वानखेडे, माया चव्हाण, पवन जंजाळ, गणेश सोनवणे, राजेंद्र निकम, संगीता राऊत, सुनीता टेकाळे, लक्ष्मीकांत धारासूरकर, रिजवान चाऊस, गणेश त्रिभुवन, अनुष्का डोळस, परमेश्वर मार्कंडे, मनीषा मोरे, शारदा ढवळे, सुनील भोटकर, विशाल व्यवहारे, शाहेदाबानू माजीद, पुंडलिक सोनाळे यांचा समावेश आहे.