शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

तंबाखूपायी महिन्याला २५ कोटींचा ‘चुना’!

By admin | Updated: May 31, 2016 00:02 IST

संजय तिपाले ल्ल बीड तंबाखूतून बीडकरांच्या खिशाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा ‘चुना’ लागत आहे. तंबाखूने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून महिन्याची उलाढाल २५ कोटींच्या घरात आहे.

संजय तिपाले ल्ल बीडतंबाखूतून बीडकरांच्या खिशाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा ‘चुना’ लागत आहे. तंबाखूने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून महिन्याची उलाढाल २५ कोटींच्या घरात आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाकिटावर ठळकपणे दाखवूनही विक्रीत फारसा फरक नाही. ३१ ते ४० वयोगटांतील व्यक्तींना तंबाखूच्या विड्याचे अक्षरश: वेड लागले आहे. परिणामी दंत, मुख रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सेवन विरोधी दिनाच्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलेला हा धक्कादायक निष्कर्ष...सहज उपलब्ध होणाऱ्या व कुठेही हातावर मळून तोंडात सोडता येणाऱ्या तंबाखूला मजुरांपासून ते नेते, अभिनेते व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच पंसती आहे. ही एकमेव अशी तलफ अशी आहे जी कोणासोबतही ‘शेअर’ करता येते. तंबाखू सोबतच बाळगावी असेही काही नाही.अनोळखी व्यक्तीकडेही तंबाखूची मागणी केली जाते.काही जणांच्या तर इतके अंगवळणी पडले आहे की, जाहीरपणे तंबाखू हातावर मळून तोंडात सोडली जाते. ग्रामीण भागात या व्यसनाचे प्रमाण अधिक असून महिलाही मोठ्या संख्येने आहारी जाऊ लागल्या आहेत. खेड्यांमध्ये १०० महिलांमागे १८ महिलांना तंबाखूचे व्यसन आहे. घातक दुष्परिणाम...: पुरूष वंध्यत्वाच्या तक्रारींत वाढतंबाखूच्या व्यसनाने नपुसकत्वासारख्या आजाराची शक्यता अधिक असते. शुक्राणुवर दुष्परिणाम होऊन पुरूष वंध्यत्वाच्या समस्या वाढतात. बिडी, सिगारेटमुळे श्वसनाचे विकार होतात. सुरूवातीला खोकला, कफाचा त्रास यामुळे श्वसनाचे काम करणाऱ्या नलिकेचे आकुंचन पावते व त्याची गती कमी होते. दम्यासह श्वसनाचे आजार जडतात. जबडा उघडताना चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात व त्रास होतो, बऱ्याच वेळेस जबड्यात दोन बोटेही जात नाहीत. याचेच रूपातंर पुढे कॅन्सरमध्ये होते. कॅन्सर, हृदयरोग आणि अर्धांगवायूशिवाय हजारो लोकांचे पाय फक्त तंबाखू सेवनांमुळे सडतात. ‘गँगरीन’ झाल्याने ते कापून टाकावे लागतात. व्यसन संपत नाही परंतु ते माणसाला संपविते. त्यामुळे शारीरिक व आर्थिक हानी कोणालाही न परवडणारीच असते.