बीड : तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगडाच्या विकासासाठी २५ कोटी रूपयांचा निधी सोमवारी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत २५ कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली. यावेळी आ. विनायक मेटे, गडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सीईओ नामदेव ननावरे, शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची उपस्थिती होती.या निधीतून गडावर भाविकांच्या सोयीसाठी विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. यामुळे गडाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
नारायणगडासाठी २५ कोटी
By admin | Updated: April 3, 2017 22:30 IST