शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारानेच आणला अडीच कोटींचा निधी; औरंगाबाद येथे सव्वाकोटी खर्चाच्या रोझ गार्डनचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:39 IST

केंद्राकडून निधीच प्राप्त होत नसल्याने विकास कामे करणारा कंत्राटदार संकटात सापडला. कंत्राटदारानेच मुंबई, दिल्ली वार्‍या करून तब्बल अडीच कोटींचा निधी मिळविला.

ठळक मुद्दे पर्यटनाला चालना देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने औरंगाबाद शहरासाठी खास मेगा सर्किट योजनेंतर्गत २४ कोटींचा घसघशीत निधी मंजूर केला होता. केंद्राकडून निधीच प्राप्त होत नसल्याने विकास कामे करणारा कंत्राटदार संकटात सापडला. कंत्राटदारानेच मुंबई, दिल्ली वार्‍या करून तब्बल अडीच कोटींचा निधी मिळविला.

औरंगाबाद : पर्यटनाला चालना देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने औरंगाबाद शहरासाठी खास मेगा सर्किट योजनेंतर्गत २४ कोटींचा घसघशीत निधी मंजूर केला होता. या निधीच्या अधीन राहून महापालिकेने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील दुभाजक, मजनूहिल येथे रोझ गार्डनचे कामही सुरू केले. केंद्राकडून निधीच प्राप्त होत नसल्याने विकास कामे करणारा कंत्राटदार संकटात सापडला. कंत्राटदारानेच मुंबई, दिल्ली वार्‍या करून तब्बल अडीच कोटींचा निधी मिळविला.

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांना ज्या मूलभूत सोयी-सुविधा मिळायला पाहिजे तशा मिळत नसल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. केंद्र शासनाने मेगा सर्किट योजनेत एमटीडीसीमार्फत औरंगाबाद शहराला २४ कोटींचा निधी मंजूर केला. महापालिकेने विविध विकास कामांच्या निविदाही प्रसिद्ध केल्या. हॉटेल कार्तिकी ते जामा मशीदपर्यंत मुगल आर्टप्रमाणे दगडाचे खास दुभाजक तयार करण्यात आले. याच बरोबर मजनूहिल येथे ३ एकर जागेवर रोझ गार्डन उभारण्याचे काम सुरू झाले. एकाच कंत्राटदाराला हे काम मिळाले. दुभाजकाचे काम संपले तरी केंद्राकडून निधी मिळत नव्हता. रोझ गार्डनचेही काम अर्धवट सोडून देण्यात आले. भाजप सरकारने जुन्या काँग्रेसच्या सर्व योजना रद्द करून टाकल्या. त्यामुळे या विकास कामांसाठी निधी मिळणे असंभव होऊन बसले. ज्या कंत्राटदाराने कामे केली त्यानेच मुंबई आणि दिल्ली येथे चकरा मारून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी या कामात मोलाची मदत केली. त्यांनी दुभाजकाच्या जुन्या कामासाठी १ कोटी आणि रोझ गार्डनला चालना देण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी केंद्राकडून मिळवून दिला. नुकताच हा निधी मनपाला प्राप्त झाल्याचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सांगितले.

शहराच्या वैभवात भर पडेलदेशभरात रोझ गार्डन बरेच आहेत. काश्मीरच्या धर्तीवर औरंगाबादेत रोझ गार्डन उभारण्यात येणार आहे. गार्डनच्या उभारणीचे बेसिक काम पूर्ण झालेले आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त सव्वाकोटीतून गार्डनचे किमान ४० ते ५० टक्के काम पूर्ण होईल. एकूण पावणेतीन कोटींमध्ये गार्डन उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. गार्डनच्या अंतिम टप्प्यात काम पोहोचल्यावर केंद्र शासनाकडून आणखी एक ते सव्वाकोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका