शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात २४९ व्यक्तींना एचआयव्हीची लागण; सात गरोदर मातांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 19:52 IST

रुग्णांच्या संख्येत काही वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड यांनी सांगितले.

औरंगाबाद : जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यात २३ आयसीटीसी केंद्रांत एप्रिल ते आॅगस्टदरम्यान ३३ हजार ४४६ जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यात २४९ व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या संख्येत काही वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड यांनी सांगितले.

जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समिती व एचआयव्ही, टीबी समन्वय समितीची त्रैमासिक आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी मंगेश गायकवाड यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक डॉ.जमादार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. लड्डा, डॉ. जी. एम. कुडलीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, विजय देशमुख, डॉ. एम. टी. साळवे, संजय पवार, ज्योती वाडेकर यांची उपस्थिती होती.

पाच महिन्यांत ३१ हजार ९१८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ गरोदर मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात ५ हजार ३९१ रुग्ण एआरटी केंद्रांत औषधोपचार घेत असल्याची माहिती मंगेश गायकवाड यांनी दिली. 

रुग्णांचे केले जाते मोफत समुपदेशनडॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, घाटी रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय, मोबाईल व्हॅन, अशा २३ आयसीटीसी केंद्रांत आणि ५० प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर माता, सामान्य रुग्ण, संशयित क्षयरोगी व जोखीम गटातील व्यक्तींची मोफत एचआयव्ही रक्तचाचणी व समुपदेशन केले जाते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय