शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात २४५ रुग्ण ‘किडनी’च्या प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 17:39 IST

दोन वर्षांपूर्वी अवयवदानाची चळवळ सुरूझालेल्या मराठवाड्यात सध्या तब्बल २४५ रुग्ण ‘किडनी’च्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देयाचबरोबर ७५ रुग्णांना यकृत, तर एकाला हवे हृदय तुलनेत अवयवदानाचे प्रमाण कमी 

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अवयवदानाची चळवळ सुरूझालेल्या मराठवाड्यात सध्या तब्बल २४५ रुग्ण ‘किडनी’च्या प्रतीक्षेत आहेत. याबरोबरच ७५ रुग्णांना यकृत, तर एकाला हृदय प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. तुलनेत अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याने अवयवांसाठी रुग्णांची ‘वेटिंग’ दिवसेंदिवस वाढत आहे. 

औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील शेकडो रुग्णांच्या आयुष्यात उजाडलेली ही नवीन पहाट होती. २०१६ पासून आतापर्यंत मराठवाड्यात २१ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. यात १७ औरंगाबाद, ३ नांदेड आणि १ लातूर येथील अवयवदात्याचा समावेश आहे. अवयवदान केलेल्या २१ दात्यांचे ६७ अवयवांचे आणि २४ नेत्रांचे प्रत्यारोपण झाले. यामध्ये ३९ किडनी, १९ यकृत आणि ९ हृदय अशा अवयवांचे प्रत्यारोपण झाले. ४२ अवयवांचे प्रत्यारोपण फक्त औरंगाबादेत झाले आहे, तर २५ अवयव हे मराठवाड्यात पाठविण्यात आले. यातील दोन हृदयांचे चेन्नई येथे प्रत्यारोपण झाले.

फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण आणि २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण करून मराठवाड्याने नवीन इतिहास रचला. एकीकडे अवयवदान चळवळ वाढत आहे आणि दुसरीकडे मात्र अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे. २४५ रुग्ण किडनी, ७५ रुग्ण यकृत व १ रुग्ण हृदयाच्या प्रतीक्षेत आहे. ही यादी कमी करण्यासाठी अवयवदानात वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती विविध कार्यक्रम राबवीत आहे. तीन वर्षांत ५० जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत.

प्रत्यारोपण केंद्रांचीही गरजबे्रनडेड रुग्णांच्या अवयवदानाच्या संख्येत वाढ होण्यासाठी प्रत्यारोपण व रिट्रिव्हल केंद्रही वाढविण्याची गरज आहे. मराठवाड्यात सध्या औरंगाबादेत ५, नांदेड येथे १ असे ६ प्रत्यारोपण केंद्र आहेत, तर औरंगाबादेत २, नांदेड येथे १, लातूर येथे १ आणि अंबाजोगई येथे १ अशी ५ रिट्रिव्हल केंद्र आहेत, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिली.  

टॅग्स :Organ donationअवयव दानMarathwadaमराठवाडाhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय